Pandharpur News: काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा तांदूळ पकडला: गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

Latest Pandharpur News: काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा तांदूळ पकडला: गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
Pandharpur News
Pandharpur NewsSaam tv
Published On

पंढरपूर (Pandharpur News): 

कर्नाटकमध्ये काळ्या बाजारात विक्रीसाठी घेवून जाणारा तांदळाचा ट्रक पोलिसांनी पकडला आहे. मात्र माढा (Pandharpur) तालुका पुरवठा विभागाकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अन्यथा पुरवठा विभागा विरोधात आंदोलन करण्याचा इशारा (MNS) मनसेने दिला आहे. (Breaking Marathi News)

Pandharpur News
Beed Crime News: धक्कादायक घटना..जन्मदात्याची मुलानेच केली हत्या; आईच्या चारित्र्यावर घ्यायचा संशय

कुर्डूवाडी पोलिसांनी गस्त घालत असताना परांडा चौकात ट्रकची तपासणी केली असता ६०० पोती ३० टन तांदूळ आढळून आला. चालकाकडे चौकशी केली असता कर्नाटकमधील तांदूळ असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांना संशय आल्यानंतर सदर ट्रक पोलीस स्टेशनमध्ये आणला आणि पुरवठा विभागाला याबाबत कळवले. यानतर पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर तांदूळ कर्नाटकचा असल्याचा अहवाल देत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. 

Pandharpur News
Nandurbar News: नंदुरबार राज्यातील पहिला अमली पदार्थ मुक्त जिल्हा; ७ हजार विद्यार्थ्यांची एकाच वेळेस शपथ

मनसेचा आंदोलनाचा इशारा 

महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी सदर प्रकरणात सहभागी पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नुकताच रेशन धान्य दुकानदारांना पुरवठा होणाऱ्या तांदूळ पिशव्यात ५ किलो धान्य कमी आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातही काही गडबड झाली असल्याचा संशय आहे. या दोन्ही घटनाचा संबंध असण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com