Pandharpur: अमानुषतेचा कळस! 20 ऊसतोड मजुरांना पंढरपूरमध्ये ठेवले डांबून, महिलांसह अल्पवयीन मुलांचाही समावेश

या डांबून ठेवलेल्या कामगारांमध्ये 16 लहान बालकांसह 4 महिलांचा तसेच 6 अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.
Pandharpur News
Pandharpur News Saam TV

सागर निकवाडे...

Pandharpur: नंदूरबार( Nandurbar) जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील भामणा येथील रहिवासी असलेल्या 24 उसतोड कामगारांच्या टोळीला तीन तुकडी पंढरपूर तालुक्यातील करवली आणि उंबरगाव येथे डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून तेथून सुटका व्हावी यासाठी मजूर तालुका प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीना विनंती करत असल्याचा व्हिडिओ हाती आला आहे. यामध्ये 16 लहान बालकांसह 4 महिलांचा तसेच 6 अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.

Pandharpur News
NCP: मोठी बातमी! शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत; नागालँडमध्ये भाजपाप्रणित सरकारला पाठिंबा

याबाबत अधिक माहिती अशी की, मागील चार महिन्यापूर्वी हे उसतोड कामासाठी भामणा गावातून पंढरपूर येथे गेले होते. या टोळीने शिवा पवार यांच्याकडे चार महिन्यापासून कामे केली, त्याची मजुरी देखील मिळाली आणि होळीच्या निमित्ताने घरी जाण्याची त्यांची तयारी सुरू होती. मात्र त्यांना शंकर नावाची व्यक्ती माझे पैसे आगोदर द्या मगच घरी जा असे धमकावत डांबून ठेवले असल्याचे मजूर सांगत आहेत.

मजुरांच्या सांगण्यानुसार त्या व्यक्तीने नंदूरबार जिल्ह्यातील बिलगाव येथील रायमल पावरा याला 4 लाख रुपये दिले असून असून रायमल पावरा तेथून फरार झाला आहे. पण आम्ही ते पैसे घेतले नसून आम्हाला या बाबतची कसलीही माहिती नाही तसेच आमची होळी जवळ येत असल्याने आम्हाला घरी जायचे आहे, असे स्पष्टिकरण त्यांनी दिले आहे.

Pandharpur News
Shahapur News : मोठी बातमी! जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात मोठी दुर्घटना; मांडव कोसळून महिला जखमी

मात्र त्या चार लाख रुपयांसाठी आम्हाला धमकावण्यात येत असून मारहाण करत आहेत, असे या मजुरांचे म्हणणे आहे. तसेच हातात पैसे नसल्याने जेवणाला देखील धान्य नाही आणि शिधा संपल्याने उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे आमची सुटका करी अशी विनंती या मजुरांनी केली आहे.

दरम्यान, उसतोड मजुरांना डांबून ठेवण्याचा प्रकार हा नवीन नसून अनेक वेळा असा अमानुषातेचा प्रकार समोर आला आहे. याबाबतीत प्रशासनाच्या वतीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच मजुरांना अमानुष वागणूक देणाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात यावा आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com