Ghati Hospital मधील नर्सच्या भावनांशी खेळ, वॉर्डबॉयवर गुन्हा दाखल

पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News, police, ghati hospital
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News, police, ghati hospital saam tv

नवनीत तापडीया

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयात वॉर्डबॉयचे आणि सहकारी नर्सचे प्रेम संबंध जुळले. काही दिवसानंतर त्याने संबंधित नर्सशी लग्न न करता अन्य युवतीशी लग्न केले. त्यामुळे निराश झालेल्या नर्सने आत्महत्या केली. या प्रकरणी पाेलिसांनी युवकावर गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News, police, ghati hospital
Ramdas Kadam News : शरद पवारांना बाप म्हणता ना, त्यांच्याकडून काही तरी शिका : उद्धव ठाकरेंना रामदास कदमांचा सल्ला

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार शहरातील घाटी रुग्णालयात ज्ञानेश्वर किसन पवार हा वॉर्डबॉयचे काम करताे. त्याने याच रुग्णालयातील नर्स पल्लवी विठ्ठलराव जाधव हिच्याशी प्रेम संबंध स्थापित केले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र नंतर तिला सोडून दुस-या युवतीशी लग्न केले. प्रियकराने आपली फसगत केली. विश्वासघात केला या तणावातून नर्सने राहत्या घरात आत्महत्या केली.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News, police, ghati hospital
Pramod Jathar On Uddhav Thackeray Barsu Visit : जे स्वत:चे प्रश्न साेडवू शकले नाहीत काेकणी माणसाचे कधी साेडवणार; उद्धव ठाकरेंच्या बारसू दाै-यावर प्रमाेद जठारांची टीका

दरम्यान या घटनेमुळे घाटी रुग्णालयात एकच खळबळ उडाली. घटनेमुळे तरुणीच्या कुटुंबीयांनी टाहो फोडला. बेगमपुरा पोलिसांनी वॉर्डबॉयवर गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com