Palghar : शाळेच्या मधल्या सुटीत चक्कर येऊन पडली; काही वेळातच विद्यार्थिनीचा मृत्यू, शवविच्छेदनात समोर आले धक्कादायक कारण

Palghar News : शाळेच्या मधल्या सुट्टीत तिला अचानक चक्कर येऊन खाली पडली. खाली पडल्याचे पाहून याच शाळेत शिकत असलेली तिची बहीण व अन्य दुसऱ्या विद्यार्थ्यीनीने वेदिकाला उठवण्याचा प्रयत्न केला
Palghar News
Palghar NewsSaam tv
Published On

फैय्याज शेख 
वाडा (पालघर)
: शाळेच्या वर्गखोलीत बसलेली असताना सापाने दंश केला. यात पाचवीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वाडा तालुक्यात घडली आहे. या घटनेत मधल्या सुटीत मुलीला चक्कर आल्याने ती पडली होती. अशा परिस्थितीत शिक्षकांनी तिला रुग्णालयात न नेता घरी नेले. या कालावधीत तिचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे कुटुंबीय संतप्त झाले असून त्यांनी शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. 

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सोनाळे येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव या संस्थेचे न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवीत शिकणारी वेदिका प्रकाश झाटे (वय ११, रा. बिलघर) हीच मृत्यू झाला आहे. वेदिका हि नेहमी प्रमाणे शाळेत गेली होती. शाळेच्या मधल्या सुट्टीत तिला अचानक चक्कर येऊन खाली पडली. खाली पडल्याचे पाहून याच शाळेत सातवीच्या वर्गात शिकत असलेली तिची बहीण व अन्य दुसऱ्या विद्यार्थ्यीनीने वेदिकाला उठवण्याचा प्रयत्न केला; मात्र तिने प्रतिसाद दिला नाही.   

Palghar News
Yamunotri Dam : उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहा:कार; यमुनोत्री धाममध्ये रस्ते खचले, महाराष्ट्रातील २०० भाविक अकडले

शिक्षकांनी थेट घरी नेले 

विद्यार्थीनी शाळेतील शिक्षकांना याबाबत माहिती दिली. धक्कादायक प्रकार म्हणजे शिक्षकांनी तिला रूग्णालयात घेऊन न जाता तिला घरी घेऊन आले असल्याचा आरोप आई- वडिलांनी केला आहे. यानंतर मुलीच्या वडिलांनी दुचाकीवरून तिला वाडा येथील रूग्णालयात घेऊन गेले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी तिला मृत घोषित केले. मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने आई- वडिलांना मोठा धक्का बसला आहे.  

Palghar News
Tukaram Maharaj Palkhi : तुकाराम महाराजांच्या पादुकांना शाही नीरा स्नान; पालखी सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश

कुटुंबीयांनी केला गंभीर आरोप 

दुसऱ्या दिवशी वेदिकाचे शवविच्छेदन झाले असात सर्पदंशाने विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालातून समोर आले. महत्वाचे म्हणजे शिक्षकांनी या विद्यार्थ्यांनीला शाळेजवळ असलेल्या रूग्णालयात घेऊन जाण्या ऐवजी तीला सरळ घरी घेऊन गेले. जर तिला शाळेतूनच रूग्णालयात नेले असते, तर कदाचीत ती वाचली असती; असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. बेजबाबदार शिक्षक व शाळेय प्रशासनावर करवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com