Crime News : फेसबूक पोस्ट शेअर करत संपवलं जीवन; मृत्यूमागचं कारण ऐकून तुम्हालाही होतील अश्रू अनावर

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी फेसबूक पोस्टमध्ये आत्महत्येचं कारण लिहिलं आहे.
Crime News
Crime NewsSaam tv

Paithan Crime News :पैठण येथून काळीज हादरवणारी बातमी समोर आली आहे. फेसबूकवर आत्महत्या करत असल्याची पोस्ट शेअर करत एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये. मुलांच्या स्वभावाला कंटाळून या व्यक्तीने आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. (Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार,पैठण तालुक्यातील दावरवाडी येथे ही खळबळजनक घटना घडली आहे. दत्ता सोरमारे असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांनी एक तास आधी फेसबूकवर "मी आत्महत्या करतोय मला माफ करा" अशी पोस्ट शेअर केली. त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Crime News
Chai Tapri Viral Video : किळसवाण कृत्य! चहावाल्याने लघवीच्या कपात ओतला चहा; ग्राहकाने चहा पिताच...पाहा Video

या वक्तीने फेसबूक पोस्टमध्ये आपली मुले संस्कारी नाहीत असे लिहून आपले जीवन संपवले आहे. पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील दत्तात्रय सोरमारे यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मोठ्या कष्टाने मुलांचं शिक्षण केलं,पण मुलांची साथ मिळात नसल्याच्या दुःखातून त्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी फेसबूक पोस्टमध्ये आत्महत्येचं कारण लिहिलं आहे. मला माफ करा मी टोकाचं पाऊल उचलत असल्याचं त्यांनी यात म्हटलं आहे. दत्तात्रय सोरमारे हे गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच भाजपचे कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. तसेच गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Crime News
Viral Video : बापरे बाप! तवा आणि विहिरीवरल्या बाबालाही टाकलं मागे; महिलेचा पाण्यावर चालतानाचा VIDEO एकदा पाहाच

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com