पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बसवले जाणार ऑक्सिजन कॉन्संट्रेटर!

मंदिर समितीच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय...
विठ्ठल रुक्मिणी मंदिर
विठ्ठल रुक्मिणी मंदिर SaamTv
Published On

पंढरपूर : पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे 700 वर्षापूर्वीचे पुरातन मंदिर आहे. मंदिरातील देवाचा भागारा अगदी लहान आहे. त्यामुळे गाभाऱ्यात भाविकांची गर्दी झाल्यानंतर श्वसनाचा त्रास होतो. तो त्रास आता कमी होणार आहे. यासाठी मंदिर समितीने विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात ऑक्सिजन कॉन्संट्रेटर (Oxygen Concentrator) बसविण्याचा निर्णय घेतला आहे. देवाच्या गाभाऱ्यात भाविकांसाठी ही सुविधा देणारी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती राज्यात पहिली ठरणार आहे.

हे देखील पहा :

विठ्ठल-रुक्मिणीचे (Vitthal Rukmini) पदस्पर्श आणि मुख दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक दररोज मंदिरात येतात. अशा गर्दीच्या वेळी भाविकांना श्वसनाचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा त्रास कमी व्हावा यासाठी मंदिर समितीने विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात ऑक्सिजन कॉन्संट्रेटर बसविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ऑक्सिजन प्रणाली बसविण्यासाठी मंदिर समितीने तसा प्रस्ताव तयार केला असून तो मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे. परवानगी नंतर त्याची अंमलबजाणी तातडीने केली जाणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी सांगितले.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर
हौसेला मोल नाही; जावयाला आणायला शेतकऱ्याने पाठवले चक्क हेलिकॉप्टर!

मागील आषाढी एकादशीच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेवेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) सहकुटुंब मंदिरात आले होते. त्यांच्यासमवेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे देखील होते. महापूजेदरम्यान पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांना गाभाऱ्यात श्वसनाचा त्रास झाला होता. त्यानंतर मंदिरात ऑक्सिजन कॉन्संट्रेटर बसवण्याचा मुद्दा पुढे आला होता. त्यावर आता मंदिर समितीने देवाच्या गाभाऱ्यात कृत्रिम ऑक्सिजन प्रणाली बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर समितीच्या या निर्णयामुळे भाविकांना देवाच्या गाभाऱ्यात मोकळा श्वास घेता येणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com