नियुक्ती पत्र मिळूनही 3 हजारांवरती तरुण बेरोजगार...

नियुक्ती पत्रात निवृत्तीचीही तारीख खाजगी सुरक्षा रक्षक भरल्याने स्वतःच्या नोकरीवर आली गदा.
नियुक्ती पत्र मिळूनही 3 हजारांवरती तरुण बेरोजगार...
नियुक्ती पत्र मिळूनही 3 हजारांवरती तरुण बेरोजगार...राजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर -

रायगड : सुरक्षा रक्षक म्हणून शासनाच्या विविध विभागात नेमणूक होण्याचे नियुक्ती पत्र रायगड सुरक्षा मंडळाच्या (Raigad Security Board) मार्फ़त हातात पडले. मात्र नियुक्ती पत्र मिळूनही अडीच वर्षांपासून जिल्ह्यातील 3 हजार 200 तरुण हे बेरोजगार म्हणून घरीच बसले आहेत. विशेष म्हणजे नियुक्ती पत्रावर निवृत्तीची तारीखही देण्यात आली आहे. नियुक्ती ठिकाणी दुसऱ्याच व्यक्तीला खाजगी एजन्सीद्वारे भरती केल्याने अधिकृत सुरक्षा रक्षकांना अखेर नोकरीसाठी आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे. अलिबाग Alibag येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector's Office) महाराष्ट्र राज्य कोळी संघाचे जिल्हाध्यक्ष जयवंत पोकळे याच्या नेतृत्वाखाली शेकडो बेरोजगार सुरक्षा रक्षक यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आमची हक्काची नोकरी आम्हाला द्या आणि या प्रकरणात चौकशी करुण कारवाई करा अशी मागणी या बेरोजगार तरुणांनी शासनाकडे केली आहे. (Over 3,000 young unemployed despite getting appointment letter)

हे देखील पहा -

रायगड सुरक्षा रक्षक मंडळामार्फत जिल्ह्यातील 3 हजार 200 तरुणांची सुरक्षा रक्षक पदासाठी 2019 साली निवड करण्यात आली होती. मात्र जवळपास दिड वर्षानंतरही यातील बहुतांश जणांना नियुक्ती पत्र देऊनही रोजगार मिळालेला नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षक पदासाठी निवड होऊनही हे सर्व जण रोजगारापासून वंचित राहीले आहेत. यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करूनही त्यांना कामावर घेण्यात आलेले नाही. कामगार मंत्री हसन मुश्रीफ Hassan Mushrif, बच्चु कडू Bacchu Kadu कामगार आयुक्तांनी या सर्वांना तातडीने कामावर समावून घेण्याबाबतचे आदेश दिले होते.

नियुक्ती पत्र मिळूनही 3 हजारांवरती तरुण बेरोजगार...
Nashik : घरच्या घरी उपचार करणं बेतलं जीवावर; 14 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू (पहा व्हिडीओ)

मात्र शासकीय, निमशासकीय आणि मंडळाकडे असणाऱ्या नोंदणीकृत अस्थापनांकडे जागा शिल्लक नसल्याचे कारण देऊन या सुरक्षा रक्षकांना नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत. या उलट खाजगी सुरक्षा रक्षकांची काही ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. रोहा तालुक्यातील धाटाव MIDC मध्ये सुमारे 400 खाजगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. तर JSW कंपनीनेही सुमारे तिनशे खाजगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली असल्याचा दावा या आंदोलनकर्ते पोकळे यांनी केला आहे. खाजगी सुरक्षा रक्षकांना (Private Security Guards) नियुक्ती देण्याऐवजी शासकीय, निमशासकीय आणि नोंदणीकृत मंडळांनी रायगड सुरक्षा रक्षक मंडळातील नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या सुरक्षा रक्षकांना नियुक्त करून घ्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या सुरक्षा रक्षकांना नियुक्त्या दिल्या जाणार नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सुरुच ठेवणार असल्याचे जयवंतराव पोकळे यांनी माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com