... तर आपलं नाणं ५५ वर्षे मार्केटमध्ये चालतंय; सुप्रिया सुळेंचा चंद्रकांतदादांना टोला

आंदोलक एसटी कर्मचारी यांचेबाबत कायदेशीर प्रकिया संपल्यानंतर मला त्यांना भेटून त्यांच्या वेदना काय आहेत आणि त्यांनी हे का केल? हे जाणुन घ्यायचं आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSaam TV
Published On

अहमदनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आदित्य ठाकरे,आणि संजय राऊत हे अयोध्येला अनेक वेळा जावून आले आहेत. रश्मी ठाकरे देखील अयोध्येला गेल्या आहेत. पुर्ण ठाकरे फॅमिली अयोध्येला नेहमी जात असते त्यामुळे त्यांचा अयोध्या दौरा राजकीय नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज पत्रकार परिषदेत केलं आहे.

त्या पुढे म्हणाल्या, '५५ वर्ष ज्या माणसावर टिका करून, तुमची हेडलाईन होत असेल तर आपलं नाणं ५५ वर्ष मार्केटमध्ये चालतंय.' असं म्हणत त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) सुप्रिया सुळे यांचा टोला लगावला आहे. 'महाराष्ट्राच्या राजकारणात जात हा पायी नव्हता. तो कोणी केला ते राज साहेब मांडतायत आणि ते मी नाही केला म्हणत आहेत.' असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं यावर सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

Sharad Pawar
Aurangabad: राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली तर रस्त्यावर उतरू; 'वंचित'चा इशारा

नुकतंच अर्थकारण रुळावर आलय दोन अडीच वर्षानंतर जग पुढे जातंय. देशातील वातावरण दुषीत होत असेल तर देशाचे नुकसान होतं आहे. सर्व सामान्यांचे नुकसान होते हे अतिशय‌ दुर्देवी आणि चुकीच्या‌ दिशेने जाणारं असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यावेळी त्यांनी एस‌टी कर्मचाऱ्यांनी (ST staff) केलेल्या हल्ल्यावर देखील भाष्य केलं त्या म्हणाल्या, आंदोलक एसटी कर्मचारी यांचेबाबत कायदेशीर प्रकिया संपल्यानंतर मला त्यांना भेटून त्यांच्या वेदना काय आहेत आणि त्यांनी हे का केल ? हे जाणुन घ्यायचं आहे असही त्या म्हणाल्या. पत्रकारांनी राष्ट्रवादी शिवसेना (Shivsena) युतीबाबत प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष महाविकास आघाडीत एकत्र काम करतायत. पुढे काय करायचय ते वरिष्ठ नेते ठरवतील असं त्यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com