Osmanabad : Tik-Tok स्टार लेडी कंडक्टरला मोठा दिलासा; एसटीकडून निलंबन मागे

उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील Tik-Tok स्टार लेडी कंडक्टरला अखेर एसटीने मोठा दिलासा दिला आहे.
Lady Conductor Mangal Giri
Lady Conductor Mangal Giri Saam TV
Published On

Osmanabad News : उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील Tik-Tok स्टार लेडी कंडक्टरला अखेर एसटीने मोठा दिलासा दिला आहे. महामंडळाने मंगल सागर गिरी या महिला कंडक्टरचं निलंबन अखेर मागे घेतलं आहे. तसेच त्यांना तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेश आगार व्यवस्थापकांनी दिले आहेत. (Tik-Tok Star Lady Conductor Mangal Giri Latest News)

Lady Conductor Mangal Giri
Nashik : नाशिकमध्ये सीबीआयची मोठी कारवाई; २ लष्करी अधिकाऱ्यांना लाच घेतांना पकडलं

काय आहे प्रकरण?

मंगल सागर गिरी या कळंब आगारामध्ये महिला कंडक्टर म्हणून कर्तव्यास आहेत. मंगल यांना सोशल मीडियाची प्रचंड आवड आहे. त्या वेगवेगळ्या गाण्यांवर व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करतात. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.

काही दिवसांपूर्वी मंगल यांनी एसटी महामंडळाचा ड्रेस घालून तुळजाभवनी देवीच्या गाण्यावर यांनी एक व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ तुफान गाजला होता. त्याला लाखो व्ह्यूज आणि कमेंट आल्या होत्या. मात्र, त्यांच्या याच व्हिडिओवर आक्षेप घेत एसटी महामंडळाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. (Latest Marathi News)

Lady Conductor Mangal Giri
Eknath Khadse : ...अन् एकनाथ खडसे रात्रभर पोलीस स्टेशनसमोरच झोपले; काय आहे प्रकरण?

स्वतःचे व्हिडीओ बनवून एस टी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मंगल यांच्याबरोबर त्यांचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या सहकाऱ्यालाही महामंडळाने निलंबित केलं होतं. (Maharashtra News)

या कारवाईनंतर सोशल मीडियावरून एसटी महामंडळावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा या कारवाईबाबत प्रशासनाला जाब विचारला होता. दरम्यान, आता महामंडळाने मंगल यांचं निलंबन मागे घेतलं असून त्यांना तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com