उस्मानाबादेत शिवसेना कार्यकर्ते आक्रमक; कैलास पाटलांचे आंदोलन चिघळले

कैलास पाटील यांचे गेली सहा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू.
Osmanabad News
Osmanabad NewsSaam Tv
Published On

कैलास चौधरी

Osmanabad News - उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या (Farmer) पिकविमा अनुदान यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेचे ठाकरे गटातील कैलास पाटील (kailas Patil) यांचे गेल्या सहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाची दखल न घेतल्याने ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काल जिल्हाधिकारी कार्यालयावर काही कार्यकर्ते चढून बसले होते. तर जिल्हाधिकारी कार्यालयाला कुलूप बंद देखील करण्यात आले होते. (Osmanabad Latest News)

Osmanabad News
Pandharpur News : ऊसदरासाठी माढ्यातील शेतकरी आक्रमक, रात्रीपासून राेखली वाहतुक (पाहा व्हिडिओ)

त्यानंतर आज पुन्हा तेरणा कॉलेज येथे टायर जाळून रस्ता अडवण्यात आला. या आंदोलनाला जिल्हाभरातुन मोठा प्रतिसाद मिळत असून आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होते आहे. कार्यकर्त्यांनी विविध भागांतील एसटी बसची तोडफोड केली आहे. तर या आंदोलनाला आता वेगळं वळण लागलं असून या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून आज पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. आज उस्मानाबाद बंदची हाक कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे. या घटनेनंतर हे आंदोलन आता कोणते वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

काय आहे आमदार कैलास पाटील यांची मागणी?

आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जोपर्यंत पिक विम्याचे पैसे जमा होत नाही तोपर्यंत उपोषण करणार असल्याचा पवित्रा घेतला आहे. त्यांचे हे उपोषण गेल्या ५ दिवसांपासून सुरू असून आजचा सहावा दिवस आहे. या आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. याकडे सरकारने लक्ष न दिल्याने कार्यकर्त्यांनी आता टायर जाळून रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला इतकेच नाही तर बसची तोडफोड करण्यास सुरूवात केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com