नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात जमावबंदीचे आदेश; 'अग्निपथ'च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

रेल्वे स्थानक परिसरात ३०० मीटर पर्यंत जमाव बंदी - पोलिसांकडून काही संशयित आंदोलक ताब्यात
Nashik News
Nashik NewsSaam Tv
Published On

नाशिक - देशभरात अग्निपथ लष्करी भरती धोरणाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने पोलीस (Police) आयुक्तालयाने नाशिकरोड रेल्वे (Nashik) स्थानक परिसरात जमावबंदीचे (Curfew) आदेश पारित केले आहे. आर्टलरी सेंटर रोड व रेल्वे स्थानक परिसरात याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. केंद्र सरकारने (Central Government) नव्याने जाहीर केलेल्या अग्निपथ लष्कर भरतीच्या विरोधात देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले आहे .

अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून या तरुणांनी उग्र आंदोलन हाती घेतले आहे,केंद्र व राज्य सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या अनेक रेल्वे गाड्यांचे जाळपोळ करून केंद्र सरकारच्या धोरणाचा कडक विरोध या आंदोलक करतांना दिसत आहे. त्याचे पडसाद नाशिक शहरात उमटू नये म्हणून आयुक्तालयाने जमावबंदीचे आदेश जारी केले आहे.

हे देखील पाहा -

त्यात उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आर्टलरी सेंटर अशोक चाकर गेट,खोले मला,कारगिल गेट वडणेर गाव,कॅट गेट नाशिक पुणे महामार्ग, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील बुचडी मैदान,आंनद रोड,छावणी परिषद कार्यालय,एअर फोर्स देवळाली,तसेच नाशिकरोडला रेल्वे स्थानक पूर्वे पश्चिम बाजूला 300 मिटर पर्यंत परिसरात संचार बंदी लागू करण्यात आली आहे. या जमावबंदीच्या काळात अनावश्यक गर्दी करणे,ज्वालान्त शील,घातक हत्यारे बाळगणे किंवा घेऊन फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.

Nashik News
चुकीला माफी नाही! लवकरच 'दगडी चाळ 2' प्रेक्षकांच्या भेटीला

देशभरातील अग्निपथ योजनेला होणार विरोध निवळण्याचं नाव घेत नाही आहे. दिवसेंदिवस योजनेला होणारा विरोध आणि निदर्शने वाढत असलयाचे चित्र सध्या दिसून येत आहे. अनेक राज्यांमध्ये हजारोंच्या संख्येने तरुण या योजनेच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com