पावसाळी अधिवेशन - अनिल देशमुखांवरून विरोधक सरकारला घेरणार?

येत्या 5 आणि 6 तारखेला विधानपरिषदेचे पावसाळी अधिवेशन आहे.
पावसाळी अधिवेशन - अनिल देशमुखांवरून विरोधक सरकारला घेरणार?
पावसाळी अधिवेशन - अनिल देशमुखांवरून विरोधक सरकारला घेरणार? Saam tv
Published On

वैदेही काणेकर

मुंबई : राज्यात सोमवारपासून (5 जून) विधानपरिषदेचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन (Rainy session of the Legislative Council) सुरू होत आहे. मात्र राज्यातील राजकीय वातावरण पाहता या अधिवेशनामध्ये मोठा गोंधळ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचे कारण म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी कोरोनाचं कारण पुढे करून चौकशीला गैरहजेरी लावली. मात्र आता ते या पावसाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार का, असा प्रश्न विरोधी पक्षाकडून उपस्थित केला जातोय.(Opposition will surround the state government on the issue of Anil Deshmukh)

पावसाळी अधिवेशन - अनिल देशमुखांवरून विरोधक सरकारला घेरणार?
पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर मतदारसंघाचा विकास करणार; आमदार अभिमन्यू पवारांचा संकल्प

एकीकडे कोरोनाची गंभीर परिस्थिती, त्यामुळे लागलेला लॉकडाऊन, प्रवासासंदर्भातले असलेले निर्बंध तर दुसरीकडे दोन दिवसाचं अधिवेशन. येत्या 5 आणि 6 तारखेला विधानपरिषदेचे पावसाळी अधिवेशन आहे. मुख्य म्हणजे कोरोनाची परिस्थिती पाहता राज्यसरकारने दोन दिवसाचेच अधिवेशन ठेवले आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा देखील रंगला होता. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनिल देशमुख या अधिवेशनाला उपस्थित राहणार का? असा देखील सवाल भाजप आमदार अतुल भातखलकर यांनी उपस्थित केला आहे.

एकीकडे सरकारने दोनच दिवसाचे अधिवेशन जरी जाहीर केलं असलं तरी यावरून विरोधकांनी राज्यसरकारला धारेवर धरले आहे. शेती आणि शेतकरी कायद्यापासून सुव्यवस्था आणि राज्याच्या संदर्भात अनेक महत्त्वाच्या गोष्टी प्रलंबित असताना आहेत. मात्र या विषयांवर कुठलीही चर्चा न करता, मागण्या ऐकुन न घेता राज्यसरकारने केवळ दोन दिवसांचे अधिवेशन ठेवले आहे. यावरून एकीकडे भाजपाने या अधिवेशनात ED, CBI, मंत्र्यांवर असलेले गंभीर आरोप, यांसारख्या मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान यावर राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. मागच्या अधिवेशनामध्ये मनसुख हिरेन प्रकरणाची सुरुवात थेट सचिन वाझेपर्यंत झाल्यामुळे महाविकास आघाडीवर भाजपने अनेक गंभीर आरोप केले. याच प्रकरणातील अनेक कागदपत्र भाजपने सादर केल्यामुळे विरोधक हे सत्ताधार्‍यांनापेक्षा वरचढ ठरले. या अधिवेशनासाठी देखील भाजपकडे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनिल देशमुख. ED ने तब्बल दोन वेळा समजावून देखील अनिल देशमुख चौकशीसाठी उपस्थित न राहिल्यामुळे भाजपकडून प्रश्नांची सरबत्ती तर होणारच आहे. शिवाय कोरोना आणि वयाचं कारण देत चौकशी समोर न गेलेले अनिल देशमुख अधिवेशनात तरी कसे येऊ शकतील. अशी टीका देखील महाविकास आघाडी ला सहन करावी लागणार आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com