सातारा, वाई, क-हाड, फलटण शहरात ऑनलाईन नाेंदणी करणा-यांनाच लस

Vaccination
Vaccination

सातारा : सातारा जिल्ह्यात कोविड 19 चा coronavirus प्रादुर्भाव सुरु आहे. त्याअनुषंगाने जिल्हा पातळीवरुन उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्यातील एक टप्पा म्हणजे लसीकरण vaccination हाेय. सातारा जिल्ह्यात कोविड 19 लसीकरण corona vaccination 10 जुलै 2021 अखेर पहिला डोस 773768 आणि 208505 एवढ्या लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 982273 एवढया लाभार्थ्यांनी कोविड 19 लसीकरण डोस घेतला आहे. (online-registration-mandatory-for-vaccination-satara-breaking-news)

जिल्ह्यातील संपुर्ण पात्र लाभार्थ्यांना नियोजनबध्द लसीकरण करण्यासाठी जिल्हास्तरावरुन योग्य नियोजन करण्यात येत आहे. त्याचधर्तीवर सातारा, कराड, फलटण व वाई या फक्त शहरी भागातील कोविड 19 लसीकरण सत्र यापुढे 100 टक्के ऑनलाईन नोंदणीनुसारच घेण्यात येणार आहेत. यामध्ये लस उपलब्धतेनुसार दररोज दुपारी 12 वाजता लसीकरण सत्र https://selfregistration.cowin.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहेत.

Vaccination
नाद खूळा; प्रद्युम्नची स्कॉटिश घाेडेसवारी अजिंक्यपदसाठी निवड

त्यामुळे यापुढे सातारा, कराड, फलटण व वाई या शहरी भागातील नागरिकांना ऑन द स्पॉट (on the spot) पध्दतीने लसीकरण करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी असे आराेग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

येत्या 13 जुलै 2021 पासून लस उपलब्धतेनुसार सातारा, कराड, फलटण व वाई या शहरी भागातील लाभार्थींनी संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करुनच लसीकरण करायचे आहे. या तालुक्यातील ग्रामीण भागातील लसीकरण सत्र ऑन द स्पॉट पध्दतीनेच सुरु राहील असे आरोग्य विभागाने कळविले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com