बिबट्याच्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी, कोसबी जंगलातील घटना!

शेळ्यांसाठी चारा आणायला गेलेल्या शेतकऱ्यावर अचानक बिबटयाने हल्ला केला या हल्यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी, कोसबी जंगलातील घटना!
बिबट्याच्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी, कोसबी जंगलातील घटना!

गोंदिया : शेळ्यांसाठी चारा आणायला गेलेल्या शेतकऱ्यावर अचानक बिबटयाने हल्ला केला या हल्यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी प्रादेशिक वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या कोसबी जंगला मध्ये घडली आहे. देवराम गहाणे असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. One person was seriously injured in the leopard attack

हे देखील पहा-

आज रविवार सकाळच्या सुमारास कोसबी येथील शेतकरी देवराम गहाणे वय अंदाजे 40 वर्ष हे आपल्या मालकीच्या शेतालगत असलेल्या जंगलात शेळ्यासाठी चारा आणायला गेले असता त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले, जखमी अवस्थेत मध्येच ते गावात चालत आले. दरम्यान त्यांच्या परिवारातील सदस्यांनी त्यांना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे दाखल केले आहे. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया येथे पाठविण्यात आले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी, कोसबी जंगलातील घटना!
रक्षाबंधनानिमित्त देपूळ गावातील सासरी गेलेल्या 400 महिलांचा साडीचोळी देऊन सन्मान!

या घटनेचीची माहिती वनविभागाला मिळताच घटना स्थळी वनविभागाचे कर्मचारी अधिकारी यांनी येऊन पाहणी केली आहे. या बिबट्याच्या हल्ल्यानंतर गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या सर्व प्रकणाचा पुढील तपास वनविभागाचे कर्मचारी करीत आहे.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com