रक्षाबंधनानिमित्त देपूळ गावातील सासरी गेलेल्या 400 महिलांचा साडीचोळी देऊन सन्मान!

गावातील प्रत्येक लेकीबाळीचा सन्मान व्हावा यासाठी वाशिम जिल्ह्यातील देपुळ गावात आतापर्यंत लग्न होऊन सासरी गेलेल्या 400 लेकीबाळीचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला.
रक्षाबंधनानिमित्त देपूळ गावातील सासरी गेलेल्या 400 महिलांचा साडीचोळी देऊन सन्मान!
रक्षाबंधनानिमित्त देपूळ गावातील सासरी गेलेल्या 400 महिलांचा साडीचोळी देऊन सन्मान!गजानन भोयर

वाशिम : रक्षाबंधनRakshabandhan हा सण राज्यभरात बहीणSister भावालाBrotherराखी बांधून साजरा करतात. मात्र काही बहिणींना भाऊ नसल्याचे उदाहरण समोर आहे.त्यामुळं गावातील प्रत्येक लेकीबाळीचा सन्मान व्हावा यासाठी वाशिम जिल्ह्यातील देपुळDepul गावात आतापर्यंत लग्न होऊन सासरी गेलेल्या 400 लेकीबाळीचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सन्मान झालेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आल आहे.400 women honored with sarees

हे देखील पहा-

वाशिम तालुक्यातील देपूळ या गावात वारकरी संप्रदायाला मानणारे नागरिक आहेत.लोकवर्गणीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या दत्त व अनुसूया मातेच्या मूर्तींची आज प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंचक्रोशीतील बहुसंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते.

रक्षाबंधनानिमित्त देपूळ गावातील सासरी गेलेल्या 400 महिलांचा साडीचोळी देऊन सन्मान!
फोटो काढण्याच्या मोहात जीव गेलेल्या युवकाचा अखेर मृतदेह सापडला

मुलीचा जन्म दर वाढावा यासाठी 'बेटी बचाव बेटी पढाव' सारखे सरकार उपक्रम राबवत आहे. मात्र समाज मनावर फारसा फरक नसल्याचं दिसून येत आहे. मात्र देपूळ गावातील नागरिकांनी मुलीच्या जन्माचे स्वागत होऊन,लेकीबाळीं प्रती समाजात आदराची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने 400 लेकीबाळींचा साडीचोळी देऊन रक्षाबंधन निमित्त सत्कार करण्यात आला. त्यामुळं या गावाने राबविलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com