Mumbai Airport News: मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्याला अटक, १ मिलियन डॉलरची केली होती मागणी

Mumbai Airport News: मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या संशयित व्यक्तीला महाराष्ट्र एटीएसने केरळमधील तिरुवनंतपुरम येथून अटक केली आहे.
Mumbai Airport News
Mumbai Airport NewsSaam Digital
Published On

Mumbai Airport News

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या संशयित व्यक्तीला महाराष्ट्र एटीएसने केरळमधील तिरुवनंतपुरम येथून अटक केली आहे. त्याच्यावर मुंबई सहारा पोलिसांनी आयपीएस ३८५, ५०१ (१) (बी) अंतर्गत गुन्हा दाखले केला असून धमकी मिळाल्यानंतर पोलिसांच एक पथक तुरुवनंपुरमला रवाना झाले होते. संशयित व्यक्तीने मेलद्वारे गुरुवारी मुबई विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. तसेच या बदल्यात १ दशलक्ष अमेरिकी डॉलर तेही बिटकॉईममध्ये देण्याची मागणी केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित व्यक्तीने गुरुवारी "quaidacasrol@gmail.com" या ईमेल आयडीवरून मुंबई इंटरनॅश्नल एअरपोर्ट लिमिटेडच्या फीडबॅक इनबॉक्समध्ये एक मेल पाठवला होता. यात तुमच्या विमानतळासाठी ही अंतिम चेतावणी आहे. आम्हाला १ मिलियन अमेरिकी डॉलर तेही बिटकॉईनच्या स्वरूपात पाठवा. जर सांगितल्याप्रमाणे झालं नाही तर विमातळाच्या टर्मिनल २ वर ४८ तासाच्या आत बॉम्बस्टोट घडवू, अशी धमकी देण्यात आली होती. २४ तासात या धमकीचे दोन मेल आल्याचे पोलिसांनी सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Airport News
Lalit Patil Crime News: ड्रग्जमाफीया ललित पाटीलसह चार जणांना न्यायालयीन कोठडी

या धमकीमुळे खळबळ माजली होती. पोलिसांचेही धाबे दणाणले होते. दरम्यान अधिकाऱ्यांनी मेलचा पत्ता शोधून काढला. मात्र तो विदेशी दाखवत होता. मात्र कसून तपासणी केली असता केरळमधील तिरुवनंतपुरम येथून मेल आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एटीएसचे एक पथक केरळला रवाना झाले आणि संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. दरम्यान पोलिसांकडून त्याची कसून तपारणी करण्यात येत आहे.

Mumbai Airport News
KDMC Medha Patkar News: मेधा पाटकर यांनी घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट; कंत्राटदार..सफाई कामगार अन् आरक्षणावर काय म्हणाल्या? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com