महाराष्ट्रात देखील भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही; नितीन गडकरींचा विश्वास

नागपुरात आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. पाच राज्यात भाजपने मिळवलेल्या विजयाचा जल्लोष भाजपतर्फे आज नागपुरात सुरु आहे.
नितीन गडकरी
नितीन गडकरी SaamTvNews
Published On

संजय डाफ

नागपूर: नागपुरात आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. पाच राज्यात भाजपने मिळवलेल्या विजयाचा जल्लोष भाजपतर्फे आज नागपुरात सुरु आहे. या विजयी रॅलीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरा शेजारी मोठी सभा होत आहे. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात मिळलेल्या यशाबद्दल फडणवीसांचे आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले तर एक दिवस महाराष्ट्रात देखील भगवा येईल असा विश्वास व्यक्त केला. (Nitin Gadkari Speech)

नागपुरमध्ये भाजपने मोठ्या रॅलीचे आयोजन केले आहे. भाजपचे (BJP) कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यात सहभागी झाले आहेत. आता काही महिन्यात नागपूर महापालिकेची निवडणूक आली आहे. त्यामुळे हे भाजपचे शक्तीप्रदर्शन आहे असचं म्हणता येईल.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आपल्या भाषणात सुरुवातीला बोलत असताना म्हणाले, "पाच राज्यांच्या निवडणुका महत्वाच्या होत्या या अतिशय महत्वपूर्ण निवडणूक होत्या. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला जे अभूतपूर्व यश मिळाले आहे. ये यश कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारा आहे."

नितीन गडकरी
नागपूरात आढळला युवतीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह! (पहा Video)

"या दोघांमुळे गोव्यात अभूतपूर्व सफलता";

"अनेक लोक चर्चा करत होते निवडणूक कठीण आहेत. विशेषतः गोव्याच्या परिस्थिती एवढ्या जागा मिळाल्या नाहीत. मनोहर पर्रीकर असतानाही आम्हाला समर्थन मिळवण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागत होता. पण यावेळच्या जनतेने बहुमत दिले. यावेळी निवडणुकीचे प्रभारी म्हणून नेतृत्व करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होती. प्रमोद सावंत मुखमंत्री होते. या दोघांमुळे गोव्यात अभूतपूर्व सफलता मिळाली म्हणून मी यांचे अभिनंदन करतो."

"विरोधी पक्षच्या वर्तमानपत्राला रोज मुलाखती";

"निवडणुकीत अनेक पक्ष उतरले होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेनसुद्धा कंबर कसली होती. रोज वर्तमानपत्राला मुलाखती देऊन भाजपचा पराभव करता येईल याचा प्रयत्न करत होते. परंतु गोव्याच्या जनतेने सांगितलं की देवेंद्र फडणविसांच काय स्थान आहे. या निवडणुकीत त्यांनी यश खुचून आणलं आहे." असं गडकरी म्हणाले.

नितीन गडकरी
Devendra Fadnavis: गोवा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है; फडणवीसांचे आव्हान

"मोदी सरकारला जनतेने शिक्कामोर्तब केले";

पुढे ते म्हणाले, "इतर तीन राज्यात अभूतपूर्व यश मिळाले. या निवडणुकीचे वैशिष्ट्ये काय होते तर, जात, पंथ सोडून भाजपवर विश्वास दाखवला हे आपलं यश आहे. तिन्ही ठिकाणी यश मिळाले. आपला भक्कम पाय उभारला आहे. मोदी सरकारला जनतेने शिक्कामोर्तब केले. आपल्याला विनंती आहे की, या निवडणुकीने सिद्ध केलं आहे की लोकं विकासाला मतदान करतात."

गडकरी म्हणाले. "या निवडणुकीने सिद्ध केले आहे की, लोक जातीवाद, पंथ या पलीकडे आपला कार्यकर्ता काम करत विकासाला महत्व देतो. आपण जातिवाद्क राजकारण संपवले आहे. त्यामुळे जातीवाद समूळ नष्ट करून, शेतकऱ्याचे कल्याण करून, आत्मनिरभर बनवून आणि आपला देश जगातील नंबर एक सुपर इकॉनॉमिक पॉवर कसा होईल हे स्वप्न मोदींनी आपल्या उराशी बाळगलं आहे. सबका साथ सबका विकास, सबका प्रयास यावर आपण काम करतो." असही गडकरी म्हणाले.

हे देखील पहा-

"एकदिवस महाराष्ट्रात देखील आपला भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही";

पुढे ते म्हणाले, आपल्या महाराष्ट्रातील कार्यकर्ते मला भेटले. रत्नदिवस मेहनत केली. आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत केली. यांचे अभिनंदन. गोव्याच्या विजय प्राप्त झालाय हा विजय इथेच थांबणार नाही, ही विजयची पताका आहे ती एकदिवस महाराष्ट्रात देखील आपला भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. असा गडकरींनी विश्वास व्यक्त केला आहे. तर येणाऱ्या निवडणुकीत मोठं यश मिळेल असा संकल्प देखील नितीन गडकरींनी नागपुरात केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com