वृद्ध दांपत्याने पत्रकार परिषद घेऊन मुलाच्या अत्याचारांचा वाचला पाढा

कर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील परसराम फलके व लक्ष्मीबाई फलके या वृद्ध दांपत्याला त्यांच्या मोठ्या मुलाने मारहाण करून घरातून काढून दिले.
वृद्ध दांपत्याने पत्रकार परिषद घेऊन मुलाच्या अत्याचारांचा वाचला पाढा
वृद्ध दांपत्याने पत्रकार परिषद घेऊन मुलाच्या अत्याचारांचा वाचला पाढासंजय जाधव
Published On

बुलढाणा - कर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील परसराम फलके व लक्ष्मीबाई फलके या वृद्ध दांपत्याला त्यांच्या मोठ्या मुलाने मारहाण करून घरातून काढून दिले. या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, मात्र कारवाई झाली नसल्याने त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आणि त्यानंतर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन न्याय मागितला होता. या संदर्भातल्या बातम्या माध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर त्यांचा मोठा मुलगा विनोद फलके याने बुलढाणा येथे येऊन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण आई-वडिलांना मारहाण केली नसून, त्यांचं पालनपोषण करण्यास तयार असल्याची माहिती देत, आई-वडिलांनी केलेले आरोप फेटाळले होते. (old couple takes press conference and told about their child harassment)

हे देखील पहा -

मात्र त्यानंतर आज पुन्हा एकदा या वृद्ध दांपत्याने पत्रकार परिषद घेऊन ''असा मुलगा ईश्वराने कोणाच्याच पोटी घालु नये, असा मुलगा असण्यापेक्षा वांझ राहणे कधीही चांगले'' असे वक्तव्य पत्रकार परिषदेत पिडीत आई-वडीलांनी केले आहे. फलके दांपत्याकडे 18 एकर शेती आहे, त्यापैकी मोठा मुलगा विनोद फलके याच्या वाट्याची 6 एकर जमीन त्याच्या नावावर करुन दिली. तसेच 6 एकर धाकटा मुलगा किसन याच्या नावावर केली, उरलेली 6 एकर शेती परसराम फलके यांच्या नावावर आहे. लहान मुलगा किसन हा नोकरीच्या निमित्ताने नांदेड येथे राहत असून आम्ही गावात वेगळे असूनही मोठा मुलगा वारंवार आमचा छळ करत असल्याचे यावेळी आई-वडिलांनी सांगितले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com