Noida News: घटस्फोटीत जोडप्याची एकत्र आत्महत्या; सुसाईड नोटमधून धक्कादायक कारण उघडकीस

Crime News: घटस्फोटीत तरूणाची पत्नी सरिता ही मेरठमध्ये राहत होती आणि एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती.
Crime News
Crime Newssaam tv
Published On

Noida Crime News:

राजधानी दिल्लीला नोएडामध्ये एक खळबळजनक घटना समोर आलीये. एका घटस्फोटित जोडप्याने आत्महत्या एकत्र येत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली आहे . (Latest Marathi News)

Crime News
Pune Crime News: डॉक्टरचा 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, पुण्यातील क्लिनिकमध्येच धक्कादायक प्रकार

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आत्महत्या केलाला तरूण हा मुळचा मेरठयेथील रहिवासी होता. नोएडाच्या एका आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून तो काम करत होता. नोकरीमुळे तो नोएडाच्या सेक्टर 122 मध्ये एकटाच रहायचा. घटस्फोटीत तरूणाची पत्नी सरिता ही मेरठमध्ये राहत होती आणि एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती.

या प्रकरणी डीसीपी हरीश चंद्र यांनी सांगितले की, सोमवारी तरुणाला त्याचे कुटुंबीय फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते.मात्र तरुण फोन उचलत नव्हता. कुटुंबियांची काळजी वाढली आणि त्यांनी शेजारील एका व्यक्तीला त्याच्या घरी जाण्यास सांगितले. शेजारी तरुणाच्या घरी पोहचला तेव्हा समोरील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

त्याने तातडीने पोलिसांना आणि तरुणाच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. पोलिसांना हा प्रकार समजतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटना स्थळावरून सुसाईड नोटही सापडलीये. विषारी पदार्थाच्या रिकाम्या आणि भरलेल्या बाटल्या मिळाल्यात. यावरून दोघांनीही विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समजलं आहे.

परंतु जर दोघे घटस्फोटित होते तर सरिता तेथे कशी पोहचली? किंवा सरिता तरुणासोबत आधीपासूनच राहत होती का? आत्महत्येच्या दिवशी ती त्याला भेटली होती का? असे अनेक प्रश्न उपस्थित राहिलेत. पोलीस याचा शोध घेत आहेत. घटस्फोटानंतरही दोघांनी एकाच घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सुसाईड नोटमध्ये काय?

पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोटमधून या घटनेचा काहीसा उलगडा झालाय. यामध्ये तरुणाने नाराज असल्याचा उल्लेख केलाय. मी आपल्या आयुष्यात कोणालाही आनंदी ठेवले नाही, असंही नोटमध्ये लिहिलं आहे. सध्या हेच तरूणाच्या आत्महत्येचे कारण असल्याचे पोलिसांचे मत आहे.

असे असले तरे हे प्रकरण अजूनही पोलिसांसाठी संशयास्पद आहे. कारण पत्नी सरिताच्या आत्महतेचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करतायत. आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी मृत तरुण आणि सरिता यांचे मोबाईल फोन आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलेत.

Crime News
Kalyan Crime: लुटण्याच्या इराद्याने ट्रक चालकाची निर्घृण हत्या; अवघ्या १८ तासात हल्लेखोरांना अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com