परभणी : साऊथ आफ्रिकेतून (Sauth Africa) आलेला कोरोनाचा नवीन ओमायक्रॉन व्हेरीयंट हा भारतासाठी ही आता चिंतेचा विषय ठरत आहे. राज्य शासनाने त्यासाठी नवीन दिशा निर्देश जारी केले आहेत. परभणी जिल्हा प्रशासन ही या संभाव्य धोक्यासाठी सज्ज झाला असून उद्यापासून जिल्ह्यातील सर्व प्रमुख इंट्री पॉईंटवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. इतर राज्यातून आणि इतर जिल्ह्यातून परभणीत दाखल होऊ पाहणाऱ्यांना आता RT-PCR टेस्ट आणि लसीशिवाय जिल्ह्यात एन्ट्री मिळणार नाही.
शिवाय त्याच ठिकानी लसीकरणची सुविधा ही मिळणार आहे. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिवाय कोविडच्या या नवीन व्हेरीयंटचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून , जनतेने प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी गोयल यांनी केले. जनतेने काळजी न घेतल्यास यापुढे जिल्ह्यात एन्ट्री बंद करण्याचा पर्याय खुला असल्याचे ही श्रीमती गोयल यांनी सांगितले , त्यामुळे येणाऱ्या दिवसात परभणीकरांनी पुरेपुर काळजी घेतली नाही, आणि नियमांची पायमल्ली केल्यास येणारे दिवस हे परभणीकरांसाठी सक्तीचे ठरू शकतात.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.