Pandharpur: एसटी कामगार आंदोलनावर ठाम, आगारातून एकही बस बाहेर पडू देणार नाही

एक वेळ महाविकास आघाडी सरकारचे शिवभोजन खाऊन जगू, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरा जवळ भीक मागू पण स्वाभिमानाने काम करू अशी भूमिका येथील एसटी कामगारांनी घेतली आहे.
St Worker
St Workerभारत नागणे
Published On

पंढरपूर - काल रात्री परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या सोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर पंढरपूर (Pandharpur) आगारातील कामगार आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. जोपर्यंत सरकार आम्हाला न्याय देणार नाही तोपर्यंत आम्ही कामावर जाणार नाही अशी भूमिका घेत पंढरपूर आगारातून एक ही बस बाहेर पडू देणार नाही असा इशारा पंढरपूर येथील एसटी कामगारांनी ( St Worker) दिला आहे. (Pandharpur St Worker Strike Latest News)

हे देखील पहा -

यामुळे एसटी कामगार आणि शासन यांच्यातील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. मागील दोन महिन्यांपासून राज्यभरातील एसटी कामगार विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. काल परिवहन मंत्री अनिल परब पंढरपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी एसटी कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर आज सोलापूर विभागाचे शिवसेना (Shivsena) संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी ही एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन एसटी प्रवासी वाहतूक सुरू करण्याची विनंती केली होती. त्यांची ही विनंती कामगारांनी धुडकावून लावली.

St Worker
Pune News: पुण्यात 15 वर्षीय मुलाची गळफास घेवून आत्महत्या

एक वेळ महाविकास आघाडी सरकारचे शिवभोजन खाऊन जगू, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरा जवळ भीक मागू पण स्वाभिमानाने काम करू अशी भूमिका येथील एसटी कामगारांनी घेतली आहे. पंढरपुरातील एसटी कामगारांच्या आंदोलनामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.एसटी कामगारांच्या आक्रमक भूमिकेमुळे आज पंढरपूर आगारातून एकही बस बाहेर पडू शकली नाही.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com