आता आश्‍वासन नको,नगरपंचायतची घोषणा करा; हिवरखेड वासियांची मागणी

अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपंचायत निर्मिती संदर्भात मागील 22 वर्षांपासून सर्वसामान्य नागरिकांचा अविरत संघर्ष सुरु आहे. विविध स्तरावरून निरंतर पाठपुरावा सुरूच आहे.
आता आश्‍वासन नको,नगरपंचायतची घोषणा करा; हिवरखेड वासियांची मागणी
आता आश्‍वासन नको,नगरपंचायतची घोषणा करा; हिवरखेड वासियांची मागणीजयेश गावांडे
Published On

अकोला : अकोला जिल्ह्यातीलAkola District हिवरखेड नगरपंचायत निर्मिती संदर्भात मागील 22 वर्षांपासून सर्वसामान्य नागरिकांचा अविरत संघर्ष सुरु आहे. विविध स्तरावरून निरंतर पाठपुरावा सुरूच आहे. चाळीस हजार हिवरखेड वासियांच्या भावना लक्षात घेऊन विधान परिषदचे आमदार अमोल मिटकरीLegislative Council MLA Amol Mitkari यांनी सुद्धा 2 ते 3 वेळा विधिमंडळात ही मागणी रेटून धरली. त्यावेळी प्रस्तावात त्रुटी असल्याचे कळविण्यात आले होते. त्यानुसार नगरविकास मंत्रालयातुनMinistry of Urban Development वारंवार काढलेल्या संपूर्ण त्रुटिंची पूर्तता करून हिवरखेड नगरपंचायतचा परिपूर्ण प्रस्ताव अकोला जिल्हाधिकारी यांच्या वतीने दि 2 ऑगस्ट 2021 रोजी प्रत्यक्ष मंत्रालयात पोहोचलेला आहे. त्यामुळे आता फक्त नगरविकास मंत्रालयाचा निर्णय होणे बाकी आहे. No assurance now, declare Nagar Panchayat; Demand of Hivarkhed residents

हे देखील पहा-

22 वर्षांपासून हिवरखेड वासियांनी संयम पकडलेला आहे. तो संयम आता तुटत आला असून हिवरखेड नगरपंचायतचीHivarkhed Nagar Panchayat तात्काळ घोषणा व्हावी, आणि इतर मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि आदर्श पत्रकार संघाच्या वतीने 15 ऑगस्ट पासून पत्रकार अर्जुन खिरोडकार यांनी आमरण उपोषणFasting सुरू केले आहे. त्यांच्या सोबत आतापर्यंत जवळपास हजार लोकांनी साखळी उपोषण करून लिखित स्वरूपात समर्थन दिले आहे. उपोषणाला तीन दिवस झाले असून दि 18 ऑगस्ट रोजी चौथा दिवस सुरू आहे. उपोषणकर्त्याची प्रकृती अत्यंत खालावली आहे व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात भरती करावे लागेल तसे तपासणी दरम्यान सांगितले. पोलिसांनी सुद्धा रुग्णालयात भरती होण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढविला आहे. परंतु ते किमान हिवरखेड नगरपंचायत ची प्राथमिक उदघोषणा झाल्याशिवाय उपोषण सोडण्यास तयार नाहीत. सदर मागणीला समस्त व्यापारी संघटनेने पाठिंबा देत उद्यापासून हिवरखेडची संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्याचा निर्धार केला आहे. संघटनेने दिला आहे एकूणच या प्रसंगी सर्वसामान्य नागरिकांच्या भावना अनावर होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शासनाने आता तात्काळ हिवरखेड नगरपंचायतची प्राथमिक घोषणा करावी आणि 40000 हिवरखेड वासियांच्या 22 वर्षापासून च्या संघर्षाला न्याय द्यावा यासाठी सर्व हिवरखेड वासी एकवटले आहेत.

आता आश्‍वासन नको,नगरपंचायतची घोषणा करा; हिवरखेड वासियांची मागणी
तालिबान्यांचा नवीन व्हिडीओ|पार्कमध्ये जाऊन खेळतायत, गाड्यांवर मस्ती करतायत

विविध स्तरातून वाढता पाठिंबा

अर्जुन खिरोडकर यांच्या आमरण उपोषणाला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व आदर्श पत्रकार संघ, हिवरखेड विकास मंच, शिवसेना, लोकजागर मंच, प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिलदादा गावंडे, समस्त व्यापारी संघटना, अग्रवाल समाज हिवरखेड, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ, सतूर सेना, खाटीक समाज बंधु, लहुजी सेना व मातंग समाज, ऑल इंडिया पॅंथर सेना विविध महिला बचत गट, गुरु भाई मित्र परिवार, एकता फाउंडेशन, सफाई कामगार संघ, विद्यार्थी सेना, यांच्यासह अनेक संघटना आणि हजारो सर्वसामान्य नागरिकांनी साखळी उपोषण करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेल्या आमरण उपोषणाची दखल घेऊन शासनाने तात्काळ मागण्या मान्य न केल्यास विविध मार्गांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा विविध संघटनांनी पाठिंबा देते वेळी दिला आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com