ऊर्जामंत्री नितीन राऊत उद्या चिपळूण दौऱ्यावर

अतिवृष्टीमुळे महावितरणचे कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील वीज यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे उद्या चिपळूण दौरा करणार आहेत.
ऊर्जामंत्री नितीन राऊत उद्या चिपळूण दौऱ्यावर
ऊर्जामंत्री नितीन राऊत उद्या चिपळूण दौऱ्यावरSaamTv
Published On

मुंबई : अतिवृष्टीमुळे आणि महापुरामुळे महावितरणचे कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील वीज यंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रत्नागिरीमधील चिपळूण मधील नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्याकरता ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे उद्या (दिनांक 29 जुलै) रोजी या परिसराचा दौरा करणार आहेत.

मागील आठवड्याभरात झालेल्या अतिवृष्टीने राज्यातील १९२७ गावे व शहरातील ९ लाख ६० हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती आहे. या सर्व पूरग्रस्त भागात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसामध्ये व पूरात साडेसहा लाख ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. महवितरच्या कर्मचाऱ्यांकडून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे.

हे देखील पहा -

चिपळूण परिसरात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांसोबतच महावितरण आणि महापारेषणच्या यंत्रणेचे देखील मोठे नुकसान झाले आहे. चिपळूण मधील अनेक भागात तारांसह पोल जमीनदोस्त झाले आहेत. अशा परिस्थितीतही नदीला आलेल्या पुराचा सामना करत, डोंगर दऱ्यांतून अवजड पोल, रोहित्रे व इतर अवजड सामग्री खांद्यावर वाहून नेऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बहुतांश भागाचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे याबद्दल कौतुक केले आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत उद्या चिपळूण दौऱ्यावर
बीडमध्ये शेतात पाणी साचून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

ऊर्जामंत्री नितीन राऊत चिपळूण तालुक्यातील वशिष्ठी नदीपूल परिसर, खेर्डी तसेच मुरादपूर या ठिकाणी जाऊन वीज कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. येथील परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांच्या अडचणीही जाणून घेणार आहेत. अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे नुकसानग्रस्त भागातील वीज दुरूस्तीसाठी तातडीने साहित्य आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी महावितरण व्यवस्थापनाला दिल्या आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com