विनायक वंजारे
सिंधुदुर्ग: शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणेंना (Nitesh Rane) १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन (Court) कोठडी सुनावली आली आहे. आज त्यांची पोलीस (Police) कोठडी संपणार होती. या प्रकरणात पुढची कारवाई होणार आहे. सरकार पक्षातर्फे १० दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने आजपर्यंत म्हणजे २ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली होती.
पहा व्हिडिओ-
परंतु आता न्यालयाने त्यांना १८ फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यावर हायकोर्टात केलेला अर्ज मागे घेत नितेश राणे शरण गेले होते. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर मागील १८ डिसेंबरला झालेल्या हल्ल्याप्रकरणी प्रमुख संशयित असलेले नितेश राणे सुमारे ३ आठवडे अज्ञातवासात राहून अटक टाळण्याकरिता न्यायालयीन लढाई लढत होते.
देशातील सर्वोत्तम वकिलांची फौज देखील त्याकरिता झटत होती. मात्र, पोलिसांकडे असलेले पुरावे आणि कायदेशीर तरतुदी लक्षात घेता ही लढाई यशस्वी होणार नाही, असे दिसू लागताच नितेश यांनी उच्च न्यायालयात केलेला जामीन अर्ज मागे घेतला. तसेच ते न्यायालयाला शरण देखील आले होते. यानंतर त्यांना १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे आणि संग्राम देसाई यांनी नियमित जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला जाणार आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.