Nitesh Rane: 'A फॉर आफताब, A फॉर....' नितेश राणेंकडून आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टची मागणी

जशी श्रद्धा वालकर प्रकरणात आफताबची नार्को टेस्ट केली होती तशीच आदित्य ठाकरेंचीही नार्को टेस्ट करा, अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे.
Nitesh Rane- Aditya Thackeray
Nitesh Rane- Aditya Thackeray Saam TV
Published On

Sushant Singh Rajput Case: लोकसभेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपुत प्रकरणात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. आदित्य ठाकरे यांच्या फोन वरुन रिया चक्रवर्तीला ४४ कॉल केले होते असा आरोप राहुल शेवाळे यांनी केला होता.

तसेच सीबीआय, मुंबई आणि बिहार पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आलेले सत्य जनतेपर्यंत पोहोचले नाही असाही आरोप त्यांनी केला होता. राहुल शेवाळे यांच्या टीकेनंतर भाजपा खासदार नितेश राणेंनीही (Nitesh Rane) या प्रकरणात आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे.

Nitesh Rane- Aditya Thackeray
Sanjay Raut Live: राहुल शेवाळेंवर भडकले संजय राऊत Live; "हे स्वतः विनयभंग करणारे"- संजय राऊत

याबाबत अधिक माहिती अशी की, खासदार राहुल शेवाळे यांच्या आरोपानंतर भाजपा खासदार नितेश राणे यांनीही आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "जेव्हापासून सुशांत आणि दिशा सालियनचा मुद्दा काढला जातो तेव्हा आदित्य ठाकरेंचेच नाव का घेतले जाते. काल ज्यांनी हे आरोप केले ते शिवसेनेचे लाडके होते. त्यांच्या मंत्रीमंडळात ते किचन कॅबिनेट मंत्री होते. त्यांच्याच मंत्री मंडळात असलेला खासदार या गोष्टी सांगत असेल तर हे गंभीर आहे."

याबद्दल पुढे बोलताना, "म्हणूनच या प्रकरणात एकदा होऊनच जाऊ द्या, जशी श्रद्धा वालकर प्रकरणात आफताबची नार्को टेस्ट केली होती तशीच आदित्य ठाकरेंचीही नार्को टेस्ट करा. ए फॉर आफताब ए ऑर आदित्य ही सगळीच विकृत्ती आहे," अशी जहरी टिकाही नितेश राणे यांनी केली.

Nitesh Rane- Aditya Thackeray
Women Dance : लग्नात नाचताना महिला बेभान; चिमुकला थोडक्यात बचावला, VIDEO पाहून थक्क व्हाल

नितेश राणे यांनी या प्रकणाची पुन्हा चौकशी करा अशीही मागणी यावेळी केली. "सुशांत सिंग आणि दिशा सालियनचे सीसीटिव्ही फुटेज का डिलेट का केली गेली. आजही दिशा सालियनचा पोस्टमार्टम रिपोर्ट बाहेर का आले नाहीत," असेही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले. दरम्यान, राहुल शेवाळे यांच्या आरोपांवर बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शेवाळेंनी स्वतःच चरित्र पाहावं असा सल्ला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com