दुर्दैवी : 90 हजारांच्या कर्जापाई वृद्ध शेतकऱ्याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या
दुर्दैवी : 90 हजारांच्या कर्जापाई वृद्ध शेतकऱ्याची शेतात गळफास घेऊन आत्महत्याSaam TV

दुर्दैवी : 90 हजारांच्या कर्जापाई वृद्ध शेतकऱ्याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

सदर शेतकऱ्यांच्या नावे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे 25 हजार तसेच बचत गट, नातेवाईकांकडून घेतलेले जवळपास 90 हजाराच्या घरात कर्ज होते.
Published on

भंडारा : दरवर्षीच्या नापिकीला कंटाळून कर्जाच्या ओज्याखाली दबलेल्या एका 60 वर्षीय शेतकऱ्याने शेतातच कडुनिंबाच्या झाडाला नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील राजनी येथे आज दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

फुकटू काशिराम ठाकरे रा. राजनी असं मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. सदर शेतकऱ्यांच्या नावे दीड एकर शेती असून यांच्या नावे एकूण 90 हजाराच्या घरात कर्ज असल्याची माहिती मृतकाच्या परिवाराकडून मिळाली आहे. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी घटनेची नोंद केला आहे. दरवर्षी पाहिजे त्या प्रमाणात शेतीतील उत्पादन होत नसल्याने कर्जाचे ओझे वाढले आणि दरवर्षप्रमाणे या वर्षी सुद्धा योग्य प्रमाणात शेती न पिकल्याने वाढलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी? या विवंचनेत मृत शेतकरी सतत असायचे.

दुर्दैवी : 90 हजारांच्या कर्जापाई वृद्ध शेतकऱ्याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या
'ST कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत न भेटणारे मुख्यमंत्री तेलगणांच्या मुख्यमंत्र्यांना मात्र आवर्जून भेटतात'

पहाटे घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत -

मृतक शेतकऱ्याला (Farmer) पहाटे उठण्याची सवय होती, सवयी प्रमाणे फुकटू ठाकरे घटनेच्या दिवशी अगदी पहाटेच्या सुमारास घराबाहेर पडले. पहाटे शेतावर कुणीच नसल्याची खात्री करत सदर शेतकऱ्याने गावालगतच्या शेतात जाणाऱ्या पांदन रस्त्यालगत असलेल्या रुपचंद ठाकरे यांच्या शेतातील कडुनिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हे देखील पहा -

दरम्यान वडील दुपार झाली तरी घरी न परतल्याने कुटुंबातील लोकांनी शोध घेतला असता शेतावर गेले असता त्यांना फुकटू ठाकरे यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला. मृत शेतकऱ्यांच्या नावे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे (Co-operative Society) 25 हजार तसेच बचत गट, नातेवाईकांकडून घेतलेले आणि इतर उसनवारीचे 60 ते 70 हजार असे 90 हजाराच्या घरात कर्ज असल्याची माहिती मृतकाचे परिवाराकडून मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच लाखांदूरचे पोलीस (Lakhandur Police) यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला आणि मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com