काम झाल्यावर भाजप राज ठाकरेंना वाऱ्यावर सोडेल; निलम गोऱ्हेंचे टीकास्त्र

'मुंबई शिवसेनेची आणि शिवसेना मुंबईची आहे, ही काळ्या दगडावरची केशरी रेष आहे.'
Raj Thackeray
Raj Thackeray SAAM TV

सांगली : राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा राजकीय गेम होऊ शकतो, राजकीय गेम म्हणजे त्यांच्यासोबत भाजप राजकीय कुरघोडी करू शकते. राज ठाकरे भाजपबद्दल अनुकूल भूमिका घेतायत, पण भाजप राज ठाकरेंना काम झाले की वाऱ्यावर सोडेल, इसापनीतीची कथा अशीच आहे. आम्ही भाजपचा अनुभव घेतला असल्याचं वक्तव्य शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आज सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलताना केलं.

राज ठाकरेंचे प्रयत्न सुरू आहेत पण भाजपवाले त्यांना तिकीट द्यायच्या वेळी वाऱ्यावर सोडून देतील. कारण, भाजपला उत्तर भारतीयांची मतं हवी असतात त्यामुळे हा धडा त्यांना लक्षात येईल असं मला वाटतं. एक गोष्ट असते माकड आणि मगरीची मैत्री असते. तुला काय पाहिजे? तुझे काळीज काढून दे! अशा प्रवृत्तीचे राजकीय पक्ष असतात त्यामुळे आम्ही योग्य वेळेला तेथून निघालो असं म्हणत गोऱ्हे यांनी भाजपवर निशाणा साधला.

त्या पुढे म्हणाल्या, काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात, तसंच नवनीत राणा (Navneet Rana) यांना 'वार्तारोग' झाला असावा, त्यामुळे त्या उठसुठ टीका करत आहेत. नवनीत राणा या उत्तम अभिनेत्या आहेत. जसे जसे डायलॉग त्यांना वरून कोणी लिहून देईल तशा त्या बोलतात. एखाद्या नाटकात रंगमंच बदलले तरी पात्र तेच असतात, तशीच परिस्थिती त्यांची आहे. केंद्रात सूत्रधार आणि डायरेक्टर आहेत. फक्त दरवेळी पात्र बदलत असतात राणा, राणे, सोमय्या अशी, त्यांना स्क्रिप्ट लिहून देणारे मुंबई आणि दिल्लीत बसले आहेत अशी टीकाही त्यांनी राणांवर केली.

Raj Thackeray
आई-बाप म्हणून भान असावं, जबाबदारीने वागा; किशोरी पेडणेकरांचा राणा दाम्पत्यावर हल्लाबोल

नवनीत राणा नवीन आहेत, लंका कुठे आहे? लंकेमध्ये काय चालले आहे पंतप्रधानांच्या मागे लोक लागलेत. त्यामुळे मुंबई शिवसेनेची आणि शिवसेना मुंबईची आहे ही काळ्या दगडावरची केशरी रेष आहे. राज ठाकरे नवनवीन प्रयोग करत असतात मात्र, त्यांचे आमदार निवडून येत नाहीत. त्यामुळे त्यांनी काहीही केले तरी लोकांच्या मनात राज ठाकरे यांना स्थान नाही. केंद्र सरकारने ठरवले आहे. जे उद्धव ठाकरेंवर टीका करतील त्यांना उज्वल योजनेसारखी वाय सुरक्षा मिळते. त्यामुळे ती एक सुरक्षा योजना सुरू केली असावी अशी टीका त्यांनी राज ठाकरेंसह भाजपवर केली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com