अखेर डोंबिवलीत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू, खा.शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश!

डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी भागातील पोस्ट ऑफिसच्या आवारात पासपोर्ट सेवा केंद्र आज अखेर सुरु झाले. केंद्रीय राज्यमंत्री देवूसिंह चौहान आणि खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते या केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले.
अखेर डोंबिवलीत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू, खा.शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश!
अखेर डोंबिवलीत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू, खा.शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश!प्रदीप भणगे
Published On

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी (MIDC) भागातील पोस्ट ऑफिसच्या आवारात पासपोर्ट (Passport) सेवा केंद्र आज अखेर सुरु झाले. केंद्रीय राज्यमंत्री देवूसिंह चौहान आणि खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते या केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि टपाल कार्यलयातील कर्मचारी उपस्थित होते. उद्घाटनच्या वेळी आपल्या भाषणात नाव न घेता विरोधाकांना टोला सुद्धा हाणला. शिंदे म्हणाले, आमची कामे अशीच चालू राहतील, त्यांनी फक्त व्हिडीओ बनवायचं काम करावे. कारण त्यांना दुसरे काम शिलक राहणार नाही.

हे देखील पहा :

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यासाठी विलंब झाला होता. यापेक्षा जास्त विलंब होऊ नये यासाठी शिंदे यांनी लोकसभा अधिवेशना दरम्यान संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांची भेट घेतली होती आणि हे केंद्र लवकर सुरू करा अशी मागणी केली. त्यावेळी त्यांनी त्या कामात दिरंगाई न करता लवकरच लवकरच पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्याचे आश्वासित केले होते. केंद्र सरकारच्या गेल्यावेळी युतीच्या कालखंडात दिवंगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या कार्यकाळात देशभरात पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शिंदे यांनी त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून कल्याण लोकसभा मतदारसंघात डोंबिवलीत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळवली. तसेच २०१७ पासून हे कार्यालय सुरू करण्यासाठी खा. शिंदे पाठपुरावा करत होते. त्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून आज  शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालय टपाल खात्याचे आणि संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांचे आभार मानले आहे.

अखेर डोंबिवलीत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू, खा.शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश!
ATM क्लोन करणारी टोळी यवतमाळ पोलिसांच्या जाळ्यात; Bihar मधून दोघांना अटक!

ठाण्यामधील पासपोर्ट सेवा केंद्र हे संपूर्ण एमएमआर प्रदेशातील एकमेव सेवा केंद्र असल्यामुळे या सेवा केंद्रावर मोठा ताण पडत होता. तसेच नागरिकांनाही लांब अंतरावरून यावे लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होते. त्यामुळे आता डोंबिवलीत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील उपनगर शहरांना खासकरून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर,टिटवाळा व इतर उपशहरांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या केंद्रात तीन पासपोर्ट कौंटर आहेत. त्यामुळे एकावेळी तीन जण पासपोर्ट काढू शकतात.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com