New Covid Rules : राज्यात रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत नाईट कर्फ्यू! वाचा नवीन नियमावली

रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असणार असून, या कालावधी दरम्यान नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नसेल. तसेच पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत जमावबंदी असणार आहे.
रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत Night Curfew; पर्यटन स्थळं बंद राहणार
रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत Night Curfew; पर्यटन स्थळं बंद राहणारSaam TV

मुंबई : देशासह राज्यभरात कोरोनाचा व ओमायक्रॉन विषाणूचा वेगाने फैलाव होत आहे. यालाच पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारकडून कोरोना निर्बंधांची नवी नियमावली जाहीर करण्यात आली असून राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

राज्यात उद्या मध्यरात्रीपासून रात्री संचारबंदी (Night Curfew) लावण्यात आली आहे. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असणार असून, या कालावधी दरम्यान नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नसेल. तसेच पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत जमावबंदी असणार आहे.

दिनांक ९ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून हि नवी नियमावली लागू होणार आहे. राज्यातील स्विमिंग पूल, स्पा, सलुन १० तारखेपासून पूर्णतः बंद राहणार आहेत. सिनेमागृहे व नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेसह सुरु राहतील. पर्यटकांची गर्दी टाळण्यासाठी टुरिस्ट स्पॉट, किल्ले, म्युजियम बंद राहणार आहेत. शॉपिंग मॉल्स ,मार्केट, खाजगी कार्यालये 50% उपस्थिती सुरु राहतील. ज्या नागरिकांनी लसींचे दोन्ही डोस घेतले असतील त्यांनाच सार्वजनिक ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. ज्या नागरिकांनी लसींचे दोन्ही डोस घेतले असतील त्यांनाच आता सार्वजनिक प्रवास करता येईल.

उद्या मध्यरात्रीपासून नाईट कर्फ्यू लागू होणार असून, रात्री 11 ते सकाळी 5 या वेळेत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरण्यावर निर्बंध असतील. RAT testing करावी लागणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थित होणाऱ्या बैठकांवर निर्बंध लावण्यात आले असून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे इथून पुढे बैठका घेण्याचे आदेश या नियमावलीत आहेत. सर्व आस्थापना रात्री १० नंतर बंद राहणार आहेत. जिल्ह्यांतर्गत प्रवास करताना सर्व कोरोना नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्याला विविध ठिकाणी दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल.

वाचा नियमावली ठळक स्वरूपात :

उद्या मध्यरात्रीपासून पहाटे पाच ते रात्री ११ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असेल.
पहाटे पाच ते रात्री ११ वाजेपर्यंत संचारबंदी
सरकारी कार्यालयांमध्ये व्हिजिटर्सना परवानगीशिवाय प्रवेश नाही.
लोकल ट्रेनवर कोणतेही निर्बंध नाहीत
सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती बंधनकारक
करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाच कार्यालयात उपस्थित राहण्याची परवानगी
विवाह सोहळ्याला फक्त ५० जणांना उपस्थित राहता येणार
अंत्यविधीला २० जणांना उपस्थित राहता येणार
राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी ५० जणांच्या उपस्थितीची अट
शाळा आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील.

स्विमींग पूल्स, स्पा, जिम, वेलनेस सेंटर आणि ब्युटी सलून्स पूर्णपणे बंद राहणार
केशकर्तनालय (सलून्स) ५० टक्के क्षमतेने चालवता येणार. सलून्स सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेतच सुरु ठेवता येणार

नियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना निर्बंधांतून सूट. खेळाडुंना बायो बबलमध्ये राहावे लागणार. प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहता येणार नाही. दर तीन दिवसांनी खेळाडुंची करोना चाचणी करणे बंधनकारक असेल.

लसीचे दोन्ही डोस न झालेल्या व्यक्ती काम करताना आढळल्यास संबंधित हॉटेल, दुकान किंवा रेस्टॉरंटवर कारवाई होणार

नाट्यगृह आणि सिनेमा थिएटर्स ५० टक्के क्षमतेने चालवता येणार. करोन लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच परवानगी. रात्री १० ते सकाळी ८ या काळात बंद ठेवावी लागणार.

आंतरराष्ट्रीय विमानप्रवास केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार
मालवाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत, केवळ कर्मचाऱ्यांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक.

अम्युझमेंट पार्क, किल्ले आणि स्थानिक पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद राहतील.
शॉपिंग मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येणार. मॉलमध्ये करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच परवानगी
हॉटेल्स आणि रेस्टारंटस सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत ५० टक्के क्षमतेने चालवता येणार.
महाराष्ट्रात प्रवेश करायचा असेल, तर कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस किंवा आरटी पीसीआ चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक
एमपीएससी, यूपीएससी परीक्षेसाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी प्रवास करणाऱ्यांना हॉल तिकिटावर प्रवास करण्याची मुभा दिली जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com