
पंढरपूर: कोरोनाचे सर्व नियम पाळून भाविकांना विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन सुरू करण्यात आले आहे. असे असतानाच मंदिर समितीचे सदस्य अतुल शास्त्री भगरे यांनीच मंदिर समितीच्या नियमांना हरताळ फासून विठ्ठलाच्या गाभाऱ्यात पुस्तक प्रकाशन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर वारकरी पाईक संघाने अतुल शास्त्री भगरे यांसह मंदिर समितीच्या अधिकार्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. (New controversy due to publication of book in the temple of Vitthal)
हे देखील पहा -
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर घटस्थापनेपासून भाविकांना मुखदर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून व सोशल डिस्टन्सींग ठेवून भाविकांना मुखदर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जात आहे. दरम्यान मंदिर समितीचे सदस्य अतुल शास्त्री भगरे यांनी मंदिर समितीचे सर्व नियम मोडून दोन दिवसांपूर्वी थेट देवाच्या गाभाऱ्यात जाऊन पुस्तक प्रकाशन केले आहे. भगरे यांच्या या पुस्तक प्रकाशनानंतर वारकरी भावीकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
भाविकांना पदस्पर्श दर्शनासाठी बंदी असताना मंदिर समिती सदस्यांना थेट देवाच्या पायाजवळ प्रवेश कसा काय देण्यात आला असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता नवा वाद समोर आला आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.