Neet Exam : नीटच्या परीक्षेत नेहा मानेची गगन भरारी; मिळवले 720 पैकी 720 गुण

Neha Mane Scored 720 Out of 720 Marks : नेहा माने या विद्यार्थिनीने नीटच्या परीक्षेत घवघवीत यशाला गवसणी घातली आहे. तिने या परीक्षेत 720 पैकी 720 मार्क मिळवलेत. यासाठी तिने नांदेड येथे राहून दोन वर्ष या परीक्षेचा अभ्यास केला.
Neha Mane Scored 720 Out of 720 Marks
Neet ExamSaam TV

नांदेड संजय सूर्यवंशी

यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील बोरी येथील नेहा माने या विद्यार्थिनीने नीटच्या परीक्षेत घवघवीत यशाला गवसणी घातली आहे. तिने या परीक्षेत 720 पैकी 720 मार्क मिळवलेत. यासाठी तिने नांदेड येथे राहून दोन वर्ष या परीक्षेचा अभ्यास केला. तिने मिळवलेल्या यशामुळे सर्वत्र तिचं कौतुक होत आहे.

Neha Mane Scored 720 Out of 720 Marks
Farmer Success Story : दुष्काळी परिस्थितीत आल्याचे उत्पादन; शेतकऱ्याला बांधावरच मिळतोय चांगला दर

अभ्यासासाठी नेहाने खाजगी शिकवणी वर्गही लावले होते. दोन वर्षात नेहाने कुठलेही सन उत्सव साजरे केले नाहीत. वेळेचे नियोजन करून योग्य अभ्यास केला. दिल्लीच्या एम्समधून तिला एमबीबीएस करायचं हे नेहाने पूर्वीच ठरवलं होतं.

तिला 720 मार्क अपेक्षित होते तेवढे तिने मिळविले. एवढे छान मार्क मिळहूनही नीटच्या निकालावर ज्या पद्धतीने प्रश्न उठत आहेत याचं वाईट वाटतं. ज्यांनी मेहनत केली त्यांचं नुकसान होऊ नये असं नेहाला वाटत आहे. प्रत्येक पालकांनी मुलांवर विश्वास ठेवला पाहिजे त्यांच्यावर कुठलेही दडपण टाकले नाही पाहिजे असं नेहाचे पालक म्हणाले.

67 विद्यार्थ्यांना कसे मिळाले 100 टक्के गुण?

एमपीएससी परीक्षा घोटाळा, हे घोटाळे थांबत नाही तोच नीट परीक्षेचं प्रकरण समोर आलं आहे. 67 विद्यार्थ्यांना कसे मिळाले 100 टक्के गुण मिळाल्याने ही परीक्षा रद्द करावी अशी मागणी विद्यार्थ्यांसह मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील परीक्षा रद्द होण्याची मागणी केली आहे.

निकालाची एकंदर टक्केवारी पाहता यंदाच्या तब्बल 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले असून बहुतांश विद्यार्थी एकाच केंद्रावरील असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे या परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप केला जात आहे. मात्र या सर्वांमध्ये खरोखर मेहनतीने यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांची चिंता वाढलीये.

Neha Mane Scored 720 Out of 720 Marks
पाण्याचे दुर्भिक्ष! उपक्रमशील शेतीतून मिळविले भरघोस उत्पन्न; वाचा नांदेड, परभणीच्या शेतक-यांची Success Story

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com