परभणी : केंद्र सरकारने केलेल्या घरगुती गॅस सिलिंडर Gas cylinder दरवाढीचा निषेध करण्यासाठी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी NCP काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारकडून दर महिन्याला घरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ करण्यात येत असून, उज्ज्वला गॅस योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले.(NCP Women's Front protests against gas price hike)
हे देखील पहा -
राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी Nationalist Congress Women's Front परभणी शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच गॅस सिलिंडरची पूजा करण्यात आली तसेच आरती करून गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. मोदी सरकार विरोधात घोषणा देत गॅस दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला.
IT ची कारवाई सूडबुद्धीतून
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांचे पुतणे व उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्याशी संबंधित कंपन्यांवरती होणारी छापेमारी तसेच अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचे मुंबईतील कार्यालय आणि अजित पवार यांच्या तीन बहिनींच्या घरासह कार्यालयांवर छापे टाकणे हा प्रकार म्हणजे सूडबुद्धीतून करण्यात आलेल्या कारवाई असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून करत या घटनेचा निषेध त्यांनी यावेळी केला.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.