Breaking : राष्ट्रवादीचे मिशन मिनी विधानसभा इलेक्शन!

राज्यात २०२२ साली होणार्‍या तब्बल १८ महापालिका, २७ जिल्हा परिषद आणि २०० च्या घरात नगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी राष्ट्रवादीने सुरू केली आहे
राष्ट्रवादीचे मिशन मिनी विधानसभा इलेक्शन
राष्ट्रवादीचे मिशन मिनी विधानसभा इलेक्शनSaamTv

महाराष्ट्रात आता स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पक्षांसह छोट्या-मोठ्या पक्षांनी देखील या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कंबर कसायला सुरुवात केली आहे. भाजप, काँग्रेस, मनसे तसेच शिवसेना या प्रमुख पक्षांचे राज्यभरात दौरे वाढल्याचे दिसून येत आहे.

हे देखील पहा -

याच अनुषंगाने २०२२ साली होऊ घातलेल्या तब्बल १८ महापालिका, २७ जिल्हा परिषद आणि २०० नगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी राष्ट्रवादीने जोमाने सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण आढावा बैठक बोलावली होती. आजच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत.

पालकमंत्र्यांनी आणि संपर्क मंत्र्यांनी त्या त्या जिल्ह्यात दौरे केले पाहिजेत पण, मेळावे घेणे मात्र टाळले पाहिजे अशी सूचना पवार यांनी केली आहे. ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवावी आणि गरज असेल तिथे मित्र पक्षांबरोबर आघाडी करण्यास पवारांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादीचे मिशन मिनी विधानसभा इलेक्शन
कोण आहेत मनोहर मामा आणि नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या (Video)

भाजपला स्थानिक स्वराज संस्थांमध्ये सत्तेपासून दूर ठेवण्याठी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याबाबत चर्चा देखील या बैठकीत झाली आहे. प्रत्येक ठिकाणच्या राजकीय परिस्थितीनुसार आघाडी की स्वबळ याचा निर्णय घेतला जाणार आहे. शरद पवारांनी आज घेतलेल्या आढावा बैठकीत निवडणणुकांच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, राज्यमंत्री आणि काही प्रमुख नेते उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com