NCP News: शरद पवारांनी आम्हाला आशिर्वाद द्यावा, सर्वांनी एकत्र आलं पाहिजे; अजित पवार गटातील नेत्याचं आवाहन

Dharmarao Baba Atram: शरद पवार साहेबांनी आम्हा सगळ्यांना आशीर्वाद दिला पाहिजे. अजित पवार यांना देखील त्यांनी आशिर्वाद दिल पाहिजे. संगळे एकत्र आले पाहीजे, अशी आशा यावेळी धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केलीये.
NCP News
NCP NewsSaam TV
Published On

NCP Party and Symbol:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांचाच असल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी दिला. सदर निर्णय शरद पवार गटासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. या निर्णयानंतर दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर दावे प्रतिदावे करण्यात आले. अशात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवारांनी अजित पवार यांना आशिर्वाद दिला पाहिजे, अशी आशा व्यक्त केली आहे.

NCP News
Election Commission on NCP : शरद पवार गटाचं नवं नाव आणि चिन्ह ठरलं, सूत्रांची माहिती

निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा अपेक्षितच होता. तो आमच्या बाजूने लागणार होता तो लागला आहे. आमच्या विरोधात निकाल लागला असता तर आम्ही देखील सुप्रीम कोर्टात गेलो असतो. त्यांच्या विरोधात निकाल लागला आहे म्हणून ते सुप्रीम कोर्ट जातील, असं धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटलं.

सर्व बाजू पाहूनच निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. शरद पवार साहेबांनी आम्हा सगळ्यांना आशीर्वाद दिला पाहिजे. अजित पवार यांना देखील त्यांनी आशिर्वाद दिल पाहिजे. सगळे एकत्र आले पाहीजे, अशी आशा यावेळी धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केलीये.

दरम्यान काल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर नवीन नाव आणि चिन्ह याबाबत शरद पवार गटाला आज संध्याकाळपर्यंत कळवण्यास सांगण्यात आले आहे. त्यात आता शरद पवार गटाने आपलं नाव आणि चिन्ह ठरवलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीये.

'मी राष्ट्रवादी पार्टी' हे नाव आणि 'उगवता सूर्य' हे चिन्ह मिळावं अशी मागणी शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ३ नावे आणि ३ चिन्हे सादर करण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला केल्या आहेत.

NCP News
Kalyan Crime News: रस्त्यात लोकांना बोलण्यात गुंतवायचा अन् दागिने चोरून पसार व्हायचा; कल्याण क्राईम ब्रांचने ठोकल्या बेड्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com