मुंबई : महाराष्ट्र्राच्या धरतीवर वादळ उठवणारा वेदांत फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्प गुजरातला गेल्यामुळं शिंदे-फडणवीस सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. बल्क ड्रग पार्क प्रकल्पही परराज्यात गेल्यामुळं राज्य सरकार विरोधकांच्या टिकेचा धनी ठरला आहे. अशातच आता पुन्हा एकदा नव्या कंपनीच्या वादामुळं राजकीय वातावरण तापलं आहे.
वेदांतानंतर आता फोन पे कंपनीचा (Phone Pay headquarter) मुंबईतील मुख्यालय कर्नाटकात हालवणीच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. वेदांतानंतर ‘फोन पे’ची बारी,गब्बर होतायेत शेजारी, महाराष्ट्र पडतोय आजारी, व्वा रे सत्ताधारी, असं ट्विटमध्ये म्हणत पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. (rohit pawar criticises maharashtra government over phone pay headquarter shifting issue)
रोहित पवार काय म्हणाले ?
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. वेदांतानंतर ‘फोन पे’ची बारी,गब्बर होतायेत शेजारी, महाराष्ट्र पडतोय आजारी, व्वा रे सत्ताधारी. टॅक्समध्ये महाराष्ट्र करतो सर्वाधिक पे, महाराष्ट्राच्या युवांना मात्र बेरोजगारीचा वे, अशा मिश्लिक टीपण्णी करत पवार यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळे वेदांत फॉक्सकॉन आणि बल्क ड्रग पार्कसारखे महाराष्ट्रात येणारे प्रकल्प परराज्यात गेल्यानंतर आता फोन पे कंपनीने सुद्धा मुंबईतील मुख्यालय कर्नाटकमध्ये हलवण्याची तयारी सुरु केली आहे. या सर्व गोष्टींना शिंदे-फडणवीस सरकारच जबाबदार आहे. वेदांत फॉक्सकॉन सारखा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर आता बल्क ड्रग पार्क हा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प देखील कर्नाटकमध्ये हलवण्यात आला आहे.
तसेच भारतातील नामांकित कंपनी फोन पे ने सुद्धा आपले मुंबईतील मुख्यालय कर्नाटकमध्ये हलवण्याची तयारी सुरु केली आहे. हे सर्व प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यामागे शिंदे- फडणवीस सरकारचा नाकर्तेपणा आहे,असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी राज्य सरकारवर केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.