मुख्यमंत्री नातवाला भेटायला चार तास घालवतात, पण...; खडसेंचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा

राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Eknath Khadse and cm Eknath Shinde
Eknath Khadse and cm Eknath Shindesaam tv
Published On

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळवणारे शिंदे-फडणवीस सरकार (Maharashtra Government) अॅक्टिव्ह मोडमध्ये आले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला नसतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज्याचा कारभार हाताळत आहेत. पण दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकारवर महाविकास आघाडीचे नेते चौफेर फटकेबाजी करताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात पूरस्थिती असतानाही नुकसान भरपाईचा कोणताही निर्णय झाला नाही. मुख्यमंत्री नातवाला भेटायला चार तास घालवतात, पण पूरग्रस्त भागात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, असं म्हणत खडसे यांनी शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

Eknath Khadse and cm Eknath Shinde
MP Bus Accident : बस अपघातानंतर बचावकार्य सुरू; फडणवीसांनी मानले CM शिवराजसिंह यांचे आभार

माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ खडसे यांनी नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. यावेळी खडसे माध्यमांशी बोलताना म्हणाले, राज्य सरकारची आता आयसीयू पेशंटसारखी परिस्थिती झाली आहे. सर्वोच्य न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोघांच्या नेतृत्वाखाली सरकार चालू आहे, असं म्हणत खडसे यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

Eknath Khadse and cm Eknath Shinde
पप्पा, रडू नका अहो..आईच्‍या मृतदेहाजवळ बसून हुंदके देत मुलाकडून वडिलांचे सांत्वन

राज्यात पूरस्थिती असतानाही नुकसान भरपाईचा कोणताही निर्णय झाला नाही. मुख्यमंत्री नातवाला भेटायला चार तास घालवतात, पण पूरग्रस्त भागात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, असा टोलाही खडसे यांनी शिंदे यांना लगावला. मध्यप्रदेशमध्ये झालेल्या बस दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करताना खडसे म्हणाले, एसटी दुर्घटनेबाबत मी माहिती घेतली. आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांनीही मदत जाहीर केली आहे. जळगावमध्ये देखील मदत कार्याला सुरुवात झालीय. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी माझी मागणी आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com