Assembly Election: आमदारांमध्ये उमेदवारीवरून नाराजीचा सूर, अजित पवारांना हुरहुर?

NCP Mla : महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीतील आमदारांमध्ये नाराजी पसरल्याचं दिसत आहे. उमेदवारी आणि महामंडळ वाटपावरून अजित पवार गटातील आमदरांमध्ये नाराजी दिसत आहे.
Assembly Election: आमदारांमध्ये उमेदवारीवरून नाराजीचा सूर, अजित पवारांना हुरहुर?
Ajit PawarhT
Published On

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे गटाने आपल्या नेत्यांच्या महामंडळावर नियुक्त्या केल्या आहेत. त्यात भाजप आणि अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्यांना संधी न दिल्याने अजितदादांच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरलीय. मात्र शिंदे गटाने महामंडळावर कोणत्या नेत्यांची नियुक्त्या केल्या आहेत पाहूयात.

शिंदे गटाला कोणती महामंडळं?

संजय शिरसाट- सिडको अध्यक्ष

सिद्धेश कदम - प्रदुषण नियंत्रण बोर्ड-अध्यक्ष-

सदा सरवणकर- सिद्धीविनायक न्यासा प्रमुख

नीलम गोऱ्हे- कॅबिनेट पदाचा दर्जा

हेमंत पाटील - हळद संशोधन केंद्र प्रमुखपदी नियुक्ती

आनंदराव अडसूळ- अनुसूचित जाती जमाती महांडळ अध्यक्ष

दीपक सावंत- कुपोषण रोखण्यासाठीच्या समितीचे प्रमुख

महेश शिंदे- उपाध्यक्ष, कृष्णा खोरे विकास महामंडळ

लोकसभा निवडणुकीच्या वेळी एकनाथ शिंदेंनी दिल्ली वाऱ्या करून जास्तीच्या जागा पदरात पाडून घेतल्या. त्यानंतर आता विधानसभेसाठीही शिंदे गटाकडून लोकसभेच्या स्ट्राईक रेटचा निकष पुढे केला जातोय. मात्र लोकसभेला एक पाऊल मागे आलेल्या अजित पवारांच्या पक्षाकडून विधानपरिषदेसाठी 300 तर विधानसभेसाठी 400 पदाधिकारी इच्छूक असल्याची माहिती समोर आलीय.

यामध्ये संधी द्या अन्यथा आम्ही पवारांकडे परत जाऊ, अशी भूमिका नेत्यांनी घेतल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. त्यामुळे अजित पवारांनी आमदारांची बैठक बोलावून मनधरणी केलीय. मात्र दादांची मनधरणी यशस्वी होणार का? आणि इच्छुकांची महामंडळांवर वर्णी लागणार का? याचीच चर्चा रंगलीय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com