महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात राष्ट्रवादी आंदोलन छेडणार, विद्या चव्हाणांचा शिंदे सरकारला इशारा

कल्याण-डोंबिवलीमध्ये महिलांवरील अत्याचाराचे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.
Ncp Leader Vidya Chavan
Ncp Leader Vidya Chavan Saam Tv
Published On

रश्मी पुराणीक

मुंबई : कल्याण-डोंबिवलीमध्ये महिलांवरील अत्याचाराचे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यामागे भाजपच्या नेत्याचा हात असून त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण (vidya chavan) यांनी पत्रकार परिषदेत दिला. पोस्कोअंतर्गत कारवाई आणि तडीपारी असताना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी व त्यांचा भाऊ कुंदन माळी दहशत निर्माण करत आहेत, मात्र, पोलीस त्यांना पाठिशी घालत आहेत,असा आरोपही चव्हाण यांनी केला. (NCP strike warring against minor girl molestation in kalyan dombivali)

Ncp Leader Vidya Chavan
India vs Australia : पहिल्या टी-२० सामन्यात 'अशी' असणार टीम इंडियाची प्लेईंग-११?

डोंबिवलीतील प्रल्हाद नारायण पाटील यांनी १० सप्टेंबर २०२२ रोजी सराईत गुंड संदीप माळी व कुंदन माळी यांच्या त्रासाला कंटाळून रेल्वेसमोर आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी व्हिडिओ करुन कुणामुळे आत्महत्या करत आहे, हे स्पष्ट केले होते. त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल झाला. मात्र, त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, असेही विद्याताई चव्हाण म्हणाल्या.सराईत गुन्हेगार संदीप माळी व कुंदन माळी या गुन्हेगारांना शिंदे सरकार पाठीशी घालण्याचे काम करत आहे.लहान शाळकरी मुलींवर अत्याचार केल्यानंतर संदीप माळीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला. मात्र या गुन्ह्यात त्याला जामीन कसा मिळाला असा सवालही विद्याताई चव्हाण यांनी उपस्थित केला.

Ncp Leader Vidya Chavan
'रामदासभाई, तुमचा पगार किती आणि बोलता किती?' किशोरी पेडणेकरांनी करून दिली फडणवीसांच्या टीकेची आठवण

ऑगस्ट महिन्यात राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस ब्रम्हा माळी यांना खंडणीसाठी याच लोकांच्या गुंडांनी मारहाण केली. मात्र, त्यांना अटक करण्याऐवजी ब्रम्हा माळी यांच्यावरच पोलिसांनी कारवाई केली.याबाबत तक्रार करुनही दखल घेतली गेली नाही.राज्याचे गृहखाते करतेय काय? भाजप पदाधिकार्‍यांना वाचवण्याचा प्रयत्न का करतेय? असा संतप्त सवालही विद्याताई चव्हाण यांनी केला.

संदीप माळी व कुंदन माळी हे दाखलेबाज गुंड असून त्यांना तडीपार करण्यात आलेले असताना ते गुंड गावात येवून हैदोस घालत आहेत. पोलीसही या गुन्हेगाराला पाठीशी घालत आहे.प्रल्हाद पाटील याने आत्महत्या करण्यापूर्वी संदीप माळी व कुंदन माळी यांच्यावर कारवाई झाली असती तर त्याला आत्महत्या करावी लागली नसती, असे माजी आमदार जगन्नाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com