आम्ही निवडणूक का हरलो? सुप्रिया सुळेंनी विरोधकांना दिले जोरदार उत्तर; म्हणाल्या, 'आपण रामाला...'

'यूपीए, राष्ट्रवादी काँग्रेस रामाला विसरले म्हणून हरले' या विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.
supriya sule
supriya sule saam tv
Published On

रश्मी पुराणिक

Supriya Sule News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंथन शिबिर सुरू आहे. या शिबिरात राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकत्यांना संबोधित केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी सुळे यांनी 'यूपीए, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रामाला विसरले म्हणून हरले' या विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.

supriya sule
CM शिंदे-शरद पवारांच्या भेटीत बरंच काहीतरी दडलंय; राष्ट्रवादी-शिंदे गट आघाडीबद्दल सूचक वक्तव्य

सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, 'आपण रामाला कधीच विसरलो नाही. राम हा आपल्या मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. राम-कृष्ण हरी म्हटल्याशिवाय राज्यात कोणाचीही सकाळ सुरू होत नाही. त्यामुळे काही मुद्दा नाही म्हणून विरोधक राम विसरले असे बोलत असतील'.

'आपण रामाला विसरलो म्हणून निवडणूक हरलो नाही. तर आपण निवडणूक देशात २ जी घोटाळा, कोळसा घोटाळा झाला, त्यामुळे देशात यूपीए सरकारची बदनामी झाली. त्यामुळे निवडणूक हरलो, अशाही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हा जमीनदारांचा पक्ष म्हणणाऱ्या टीकाकारांना प्रत्युत्तर देताना सुळे म्हणाल्या, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जमीनदारांचा नाही. हा पक्ष कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आहे. हे आपल्या स्वत:ला पटलं पाहिजे. सगळ्यात अधिक शिक्षण संस्था या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. सगळ्यात अधिक सहकार चळवळीतील साखर कारखाने कोण चालवतं तर राष्ट्रवादी चालवते'.

'आशियातील सर्वात मोठी बँक सहकार चळवळीत कोण चालवत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस चालवते. देशातील सगळ्यात चांगली जिल्हा परिषद कोण चालवतं तर राष्ट्रवादी चालवते. कोरोना काळात माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, माजी अर्थ मंत्री अजित पवार यांनी खूप चांगलं काम केलं, असेही सुळे पुढे म्हणाल्या.

'आपण कायदे बनवणारे आहोत, आम्ही मनोरंजन करणारे नाहीत. माध्यमांसाठी आपण प्रतिक्रियावादी असतो. प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याचा आग्रह कशाला ? आपण चॅनल चालवण्याचा मक्ता घेतला आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. 'माध्यमात संवाद असावा, त्यात प्रलोभन आणि धाक असू नये. मात्र, आजकाल धाक आणि प्रलोभन दिसते, असेही सुळे म्हणाल्या.

supriya sule
गुलाबराव पाटलांच्या 'त्या' वक्तव्यावर जयंत पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले,'भाजपबरोबर...'

'देशात रस्ते आपण केले. शिक्षण, वीज, रुग्णालय केले. मोबाईल आपल्या काळात आले. ६० वर्षात आम्ही काय केलं म्हणून तुम्ही इथे बसून विचारू शकता. तुम्ही आठ वर्षात काय केलं? सांगा ना ? या बागुलबुवा मधून बाहेर पडुया. ताकदीने लढुया', अशा देखील सुळे म्हणाल्या.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com