Nagar Panchayat Elections: विरोधकांना चितपट करत आबांचा पुत्र विजयी!

Nagar Panchayat Elections: राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायत स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेऊन राष्ट्रवादी विरुद्ध महाविकास आघाडी असे पॅनल लागले आहे.
Nagar Panchayat Election Results
Nagar Panchayat Election ResultsSaam Tv News

सांगली: कवठे- महांकाळ ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रोहित पाटील यांचा दणदणीत विजय झाला आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत ज्येष्ठ नेते आर. आर. पाटील यांचे ते सुपुत्र आहेत. रोहित पाटील (Rohit Patil NCP) हे अवघ्या 23 वर्षाचे आहेत, त्यांना हरवण्यासाठी सर्वच पक्ष एकत्र आले आहेत त्यामुळे निवडणूक चांगलीच रंगत आली आहे. (NCP Leader Rohit Patil Wins Kavathe Mahankal Nagar Panchayat Seat)

हे देखील पहा -

"माझं वय 23 आहे पण 25 वय होईपर्यंत विरोधकांकडे काही ठेवत नाही." असं ते निवडणुक प्रचारांच्या वेळी म्हणाले होते. त्यांचं ते वाक्य खरं होताना दिसत आहे. कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणूकीत (Nagar Panchayat Election) राष्ट्रवादीचे (NCP) युवा नेते रोहित आर.आर. पाटील विरोधात इतर सर्व पक्ष अशी चुरस तिथे लागली आहे.

शहरांमध्ये खासदार संजय काका पाटील भाजपा आणि घोरपडे शिवसेना, सगरे गट राष्ट्रवादी आणि गजानन कोठावळे गट अशी मिळून सर्वजण एकत्र येऊन महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) निर्माण केली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायत स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेऊन रोहित पाटील यांनी राष्ट्रवादी विरुद्ध महाविकास आघाडी असे पॅनल लागले आहे. तर कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी ही निवडणूक लागली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com