Rohit Patil News : 'मविआ'च्या काळात शेतकऱ्यांसाठी तातडीने निर्णय झाले अन् आज..., राेहित पाटलांची सरकारवर टीकेची झाेड

राज्यातील एकही बडे मंत्री शेतकऱ्यांच्या मागे आम्ही उभे आहे असं सांगताना दिसत नाही.
sangli, rohit patil news
sangli, rohit patil newssaam tv
Published On

Rohit Patil Latest News : पंचनामेच होणार नसतील तर सरकार कुठल्या निकषावरती शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार आहे असा सवाल राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील (ncp leader rohit patil) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला आहे. नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत अशी मागणी पाटील यांनी केली आहे. (Maharashtra News)

sangli, rohit patil news
Maratha Reservation News : मराठा समाजाची राज्य सरकारवर भिस्त; आरक्षणाच्या याचिकेवर SC त आज सुनावणी

अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी बागा पडलेल्या आहेत तर कुठे बेदाणा भिजला आहे. राज्य सरकारने तातडीने अवकाळीचे पंचनामे सुरू केले पाहिजेत. आज पंचनामे कुठेही होत नाहीयेत. हे लोकांकडून, शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे.

sangli, rohit patil news
Christian Community Morcha News : अन्यायाच्या विराेधात ख्रिस्ती समाज एकवटला; उद्या आझाद मैदानावर महामोर्चा

पंचनामेच होणार नसतील तर सरकार कुठल्या निकषावरती अनुदान देणार आहे असे म्हणत नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत अशी मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी शिंदे फडणीस सरकारकडे केली आहे. ते सांगलीत बोलत होते.

राज्यातील एकही बडे मंत्री शेतकऱ्यांच्या मागे आम्ही उभे आहे असं सांगताना दिसत नाही. त्यामुळे कुठल्या आधारावरती किंवा कुठल्या निकषावर आपण या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देणार आहे. हे सुद्धा त्या मंत्र्यांनी स्पष्ट करावे. त्यामुळे त्वरित पंचनामे झाले पाहिजेत ही मागणी सर्व द्राक्ष उत्पादक आणि बेदाणा उत्पादकांच्या माध्यमातून आम्ही करतोय असे रोहित पाटील यांनी म्हंटले.

sangli, rohit patil news
Swabhimani Shetkari Sanghatana News : ...अन्यथा राज्यातील शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल; 'स्वाभिमानी'चा सरकारला इशारा

एखाद्या शेतकऱ्याच्या बांधा संदर्भात निर्णय घ्यायचा असता तर तो मंत्रालय मध्ये बसून घेता आला असता. मात्र आता परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आकडा मोठा आहे. आता शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन काही निर्णय थेट घेतले गेले पाहिजे होते.

आता अयोध्येत जाऊन जर महाराष्ट्र मधील शेतकऱ्याच्या बांधावरचे इथले प्रश्न सुटणार असतील तर मात्र सर्व सामान्य जनता जनतेला वेठीस धरल्याप्रमाणे ही अवस्था आहे. अशा पध्दतीने शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम कुठल्याही मंत्र्याने किंवा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा करू नये.

शेतकऱ्यांना फार काळ नुकसान भरपाई देण्यापासून वेठीस धरणही योग्य नाही. ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले गेले त्या पद्धतीने त्वरित पंचनामे, अनुदान वाटप या सगळ्या बाबतीत सरकारकडून तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे असेही रोहित पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com