'सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही', मेहबुब शेख यांचा पलटवार

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या सांगण्यावरून खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.
Mehboob Shaikh and chitra wagh
Mehboob Shaikh and chitra waghsaam tv

बीड : राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष (Mehboob Shaikh) मेहबुब शेख यांच्या विरोधात तक्रार दिलेल्या तरुणीने घुमजाव करत भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांच्या विरोधात तक्रार दिल्याची माहिती समोर आलीय. मेहबूब शेख यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. पंरतु, आता या प्रकरणाला नवे वळण लागले असून मोठा खुलासा करण्यात आला आहे.

Mehboob Shaikh and chitra wagh
बीड - परळी महामार्ग बनला मृत्यूचा सापळा; सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात, १ ठार

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या सांगण्यावरून खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. तसेच पीडित तरुणीने औरंगाबादच्या जिंसी पोलीस ठाण्यात गुन्हा दखल केला आहे. या एफआयरमध्ये सुरेश धस (Suresh Dhas), चित्रा वाघ आणि मालेगाव येथील माजी नगरसेवक नदमोद्दीन शेख यांचे नाव आहे. त्यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणावर मेहबूब शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Mehboob Shaikh and chitra wagh
विधान परिषदेच्या ५ जागा भाजपच जिंकणार; 'या' नेत्याचा दावा

माध्यमांशी बोलताना शेख म्हणाले, माझ्यावर गुन्हा दाखल केलेल्या मुलीने आज फिर्याद दिलीय. माझ्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी भाजपाच्या दोन नेत्यांनी तरुणीला प्रवृत्त केले. याबाबतची माहिती मला पत्रकारांकडून मिळाली आहे. मात्र, मला एफआयआरची प्रत मिळाली नाही.मला एफआयआरची प्रत मिळाल्यावर मी सविस्तरपणे बोलतो. पण मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो, डोळ्यात पाणी आणून सांगितले आणी नियतीने सत्य समोर आणले. उसके घर मै देर है अंधेर नाही, सत्य परेशान हो सकता है पराजीत नही.त्याचबरोबर जे कुणी नेते यामध्ये सहभागी असतील त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केल्याशिवाय गप्प राहणार नाही.

Edited By - Naresh shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com