Jitendra Awhad: महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराजांना भारतरत्न द्या; राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात जितेंद्र आव्हाडांची मागणी

Maharashtra Politics: महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराज यांना भारतरत्न मिळालच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीला शरद पवारांसह सर्वांनी हात वर करून समर्थन दिलं.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSaam Digital
Published On

Jitendra Awhad

महाराष्ट्राला महिला समाजसुधारकांचा मोठा इतिहास आहे. संकटाला समोर बघून पुरुष कोसळतो पण महिला खांद्यावर हात ठेवून सोबत उभी राहते. मात्र हा संघर्षाचा काळ आहे त्यामुळे केवळ सावित्री नाही तर आहिल्या पण व्हावं लागेल. मोदी सरकारने यावेळी बरेच भारतरत्न पुरस्कार जाहीर केले. आता महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराज यांना भारतरत्न मिळालच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीला शरद पवारांसह सर्वांनी हात वर करून समर्थन दिलं.

३ महिन्यात पक्ष सत्तेत गेला--शरद पवार

२५ वर्षांपूर्वी यांच सभागृहात राष्ट्रवादीच्या निर्मिताचा ठराव केला. पक्ष स्थापन केला आणि शिवाजी पार्कवर राज्यभरातून लाखो कार्यकर्ते आले. पक्ष वाढविण्यासाठी पावलं टाकली. पक्षाची स्थापना झाल्यावर ३ महिन्यात पक्ष सत्तेत गेला.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू, आंबेडकर यांचा आदर्श आपल्याकडे आहे. केवळ भाषणात त्यांचा उल्लेख पुरेसा नाही. त्यांनी काय योगदान दिलं यावर विचार करण्याची गरज आहे. महात्मा फुले- सावित्रीबाई यांनी समाजातील लोकांना शिक्षित करण्याच काम केलं, मुलींची शाळा काढली, स्त्री शिक्षणाचा पाया घातला.

कॅरेक्टर सर्टिफिकेट दाखवून मंत्रालयात प्रवेश द्या; जयंत पाटील

राज्यांत द्वेषाचे राजकारण सुरू आहे. मागील काही वर्षापासून राज्यांत हे निर्माण केलं जातं आहे. उल्लासनगरला आमदाराने गोळीबार केला आणि त्याने मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला. पोलीस ठाण्यात गोळीबार होण्याची ही पहिली घटना आहे. दहिसरला फेसबुक लाईव्ह सुरू असताना गोळीबाचं कारण अद्याप समोर आलं नाहीं. गुंड मंत्रालयात रीलस बनवत आहेत मुख्यमंत्र्यांबरोबर गुंडांचे फोटो व्हायरल होतं आहेत. आता आमची मागणी आहे की गेटवर कॅरेक्टर सर्टिफिकेट दाखवून मंत्रालयात प्रवेश मिळायला हवा.

Jitendra Awhad
Unseasonal Rain : अवकाळी पाऊस बरसला; कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य भिजले

माझ्या समोर राज्यांतील माय माउली होती-अमोल कोल्हे

मला अनेकजण विचारतात हा निर्णय तुम्ही का घेतला? हा निर्णय घेताना माझ्या समोर होती ती राज्यांतील माय माउली होती कारण ती माय माउली आपल्या लेकराला सांगते चटणी भाकरी खा मात्र तत्वाने जग. कोणतीही माय माउली सांगत नाही की चोरी चपाटी कर आणि श्रीमंत हो.

Jitendra Awhad
NCP MLA Disqualification Verdict: अजित पवार यांचे सर्व आमदार पात्र; शरद पवार गटालाही दिलासा,निकाल नेमका कोणाच्या बाजुने लागला?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com