पंढरपूर : पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व पंढरपुरचे राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्यावर डिझेल अपहार केल्याप्रकरणी पंढरपूर (Pandharpur) तालुका पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारखान्याचे सभासद संजय पाटील यांनी न्यायालयात याबाबत तक्रार केली होती.
हे देखील पाहा :
न्यायालयाच्या आदेशानुसार आज भगीरथ भालके, तत्कालीन कारखान्याचे कार्यकारी संचालक बाळासाहेब कर्पे, सरकोली येथील पेट्रोल पंप मालकासह चार जणांवर 420 या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या विठ्ठल सहकारी साखर (Vitthal Sugar Factory) कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. अशातच कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके व तत्कालीन कार्यकारी संचालक यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील साखर कारखानदारीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सुमारे सोळा हजार लिटरच्या बोगस पावत्या तयार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.