Eknath Khadase : शिंदे-फडणवीस सरकारमधील 50 ते 60 आमदारांमध्ये अस्वस्थता; खडसेंचा खळबळजनक दावा

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे.
Eknath Khadse, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Khadse, Eknath Shinde, Devendra FadnavisSaam TV
Published On

अमरावती : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. बच्चू कडू यांच्यासह शिंदे फडणवीस सरकारमधील 50 ते 60 आमदारांमध्ये अस्वस्ता आहे, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसे हे आज अमरावतीत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना हा दावा केला आहे.

Eknath Khadse, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Abdul Sattar : सत्तारांना येत्या निवडणुकीत सिल्लोडमध्ये.., चंद्रकांत खैरेंचं मोठं विधान

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu)  आणि रवी राणा यांच्यात सध्या जोरदार वाद सुरू आहे. या वादामुळे शिंदे-फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. रवी राणा (Ravi Rana) यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे १ तारखेपर्यंत द्यावेत, अन्यथा मोठा निर्णय घेऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

बच्चू कडू यांच्या या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी अमरावतीच्या मेळघाटात बोलताना खळबळजनक दावा केला. बच्चू कडू सह 50 ते 60 अपक्ष आमदाराकडे प्रचंड अस्वस्थ आहे, जोपर्यंत मंत्रिमंडळ पक्षाचा विस्तार होत नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये नाराजी व अस्वस्थता कायम राहील, असं खडसेंनी म्हटलं आहे. (Maharashtra Political News)

Eknath Khadse, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Bacchu Kadu : बच्चू कडूंना 'ते' वक्तव्य भोवणार? महिला मुक्ती मोर्चा आक्रमक, गुन्हाही दाखल

त्याचबरोबर मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून सर्वे आमदार आहेत. बच्चू कडू यांना सुद्धा कॅबिनेट मंत्रीपद हवं असेल, त्यासाठी ते सरकारवर दबाव तंत्राचा वापर करीत आहे. त्यांच्यासोबत आठ आमदार आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

एक तारखेला कोणता बॉम्ब फोडणार?

बच्चू कडूंनी रवी राणांना आणि राज्य सरकारलाही १ नोव्हेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. त्याआधी यासंदर्भात खुलासा करण्याचं किंवा पुरावे सादर करण्याचं आव्हान त्यांनी दिलं आहे. “एक तारखेला राणाच्या बैठकीतले व्हिडीओ रिलीज करणार. कसं षडयंत्र रचलं जातं ते सगळं समोर येईल. एक तारखेला ट्रेलर असेल. त्यानंतर चित्रपट १५ दिवसांनी पूर्ण होईल”, असं सूचक विधान बच्चू कडूंनी यावेळी केलं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com