Naxalites issues warning letter: आगामी लोकसभा निवडणुकांचे राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. एकीकडे राजकीय वर्तुळात निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू असतानाच नक्षलवाद्यांच्या एका परिपत्रकाने खळबळ उडाली आहे. नक्षलवाद्यांचे एक 27 पानांचे परिपत्रक समोर आले आहे. या परिपत्रकातून त्यांनी लोकसभेसाठी मेगाप्लॅन तयार केला असून काही राज्यांना धोका असल्याचेही उघड झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नक्षलवाद्यांनी (Naxal) २७ पेजेसच परिपत्रक जारी करुन आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) अडचणी निर्माण करण्याचा मेगा प्लॅन तयार केला आहे. शहरी भागात नेटवर्क वाढविणाऱ्यावर नक्षलवादी भर देणार असल्याचे या परिपत्रकातून सांगण्यात आले आहे.
२७ पानांच्या पत्रकात नक्षलवाद्यांच्या वर्षभराचे प्लॅन सांगण्यात आले आहेत. नक्षलवादी पार्टीच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त हे २७ पानी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. परिपत्रकात नक्षलवादी शहरी फ्रंटच्या माध्यमातून लोकांमध्ये असंतोष निर्माण करुन, शहरी लोकांना नक्षल चळवळीशी जोडण्याचा नक्षलवाद्यांचा प्लान आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या शहरात नक्षलवाद्यांचे मजबूत नेटवर्क आहे. त्यामुळेच या पाच शहरांना धोका असून आगामी लोकसभा निवडणुकीत अडचणी निर्माण करण्याचा नक्षलवाद्यांचा प्लान आहे. या परिपत्रकाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या परिपत्रकानंतर ५५ नक्षलवादी संघटनांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.