Navi Mumbai Water Supply: नवी मुंबईत उद्या ८ तास पाणीबाणी, कोणत्या भागात होणार कपात?

Navi Mumbai Water Supply Update News: नवी मुंबईत उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी कपात केली जाते. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या स्त्रोतांमध्ये पाणी कमी झाल्याने दरवर्षी हा निर्णय घेतला जातो.
Navi Mumbai  Water supply to be cut
Navi Mumbai Water supply to be cutSaamTV
Published On

नवी मुंबई : नवी मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शहरात उद्या म्हणजे मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर बुधवारी कमी दाबाने आणि अपुऱ्या प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं केलं आहे.

पाणी पुरवठा बंद असल्याचं कारण काय?

नवी मुंबईत उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी कपात केली जाते. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या स्त्रोतांमध्ये पाणी कमी झाल्याने दरवर्षी हा निर्णय घेतला जातो. मात्र, आता पालिकेचा पाणी पुरवठा योग्य असताना हा देखील उद्या शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय करण्यात आला आहे.

Navi Mumbai  Water supply to be cut
Maharashtra Politics : भाजप नाशिक सोडेना, दादा रायगडवर ठाम, गोगावलेंनी केली शिंदेंची कोंडी, पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार?

नवी मुंबई शहरातील बेलपाडा मेट्रो स्टेशनजवळ मोरबे मुख्य जलवाहिनीला झालेल्या पाणी गळतीच्या दुरुस्ती काम महापालिकेनं हाती घेतलं आहे. त्यामुळे शहरातील म्हणजेच, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली विभागात देखील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. उद्या सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत अशाप्रकारे १० तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

नवी मुंबई शहरातील बेलपाडा मेट्रो स्टेशनजवळ मोरबे मुख्य जलवाहिनीला झालेल्या पाणी गळतीच्या दुरुस्ती काम महापालिकेनं हाती घेतलं आहे. त्यामुळे शहरातील म्हणजेच, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली विभागात देखील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. उद्या सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत अशाप्रकारे १० तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

Navi Mumbai  Water supply to be cut
Buldhana News: 'बाळाच्या पोटात बाळ' दुर्मिळ घटनेतील महिलेची सुरक्षित प्रसुती, दोघांचीही प्रकृती स्थिर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com