नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाने राजकारण तापले असताना मुंबई विमानतळाला दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे, अशी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड मागणी समोर आली आहे. वसंतराव नाईकांनी महाराष्ट्राचे सतत साडे अकरा वर्षे मुख्यमंत्री पद भूषविले आहे. हरित क्रांतीचे ते जनक मानले जातात. शिवाय नवी मुंबई वसविण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.
रोजगार हमी योजना हे त्यांचीच देण मानली जाते. बंजारा समजासाठी अजूनही ते दैवतच आहेत. महाराष्ट्रात जवळपास दीड लाख बंजारा समाजाचे लोक आहेत. मुख्यमंत्री या त्यांच्या मागणीकडे कसं बघतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.