Russia Ukraine War: युद्धाच्या ढगातून युक्रेनहून आणला श्वान

श्वान हा माणसाचा अतिशय इमानदार पाळीव म्हणून अनेक अनुभव आहे. पण या मुक्या प्राण्याप्रती तितकीच इमानदारी दाखविणारे मालकही काही कमी नाहीत. अशापैकीच रोहन आंबुरे या युवकाची सध्या नाशिकला चर्चा आहे
Russia Ukraine War: युद्धाच्या ढगातून युक्रेनहून आणला श्वान
Russia Ukraine War: युद्धाच्या ढगातून युक्रेनहून आणला श्वान-Saam TV

नाशिक : माणसांपेक्षा प्राणी जास्त प्रामाणिक असतात. ते माणसावर अटी-शर्ती विरहित प्रेम करतात. त्यामुळे लहानपणापासून मी प्राण्यासोबत कुटुंबातील सदस्य या भावनेतून प्रेम करीत आलो. अडचणीच्या काळात आपण कुटुंबातील सदस्याला एकटे सोडतो का, मी तेच केले. जिथे युद्धामुळे माणूस सुरक्षित नाही. तिथे माझा डेल्टा कसा सुरक्षित राहिला असता. त्यामुळेच किंमत मोजून अडचणी सोसून मी त्याला सोबत आणले, हे बोल आहे ते युक्रेनमधून श्वानासह नाशिकला परतलेला रोहन आंबुरे यांचे...

युद्धजन्‍य स्थितीतून युक्रेन (Russia Ukrain War) बाहेर पडू की नाही याची खात्री नसतांना अशाही स्थितीत पाळीव डेल्टा या श्वनासाठी सात दिवस स्वतःचा जीव टांगणीला लावून तो युक्रेनमध्ये थांबून राहिला. श्वानाचा पासपोर्ट काढला. श्वानाप्रती आस्था जोपासणारा रोहन आंबुरे सोमवारी (ता.७) सकाळी नाशिकला (Nashik) दाखल झाला अन्‌ त्यांच्या कुटुंबाने सुटकेचा निःश्वास सोडला. नाशिकमध्ये पहाटे दाखल झाल्यानंतर रोहन याने ‘सकाळ’ जवळ त्याच्या व डेल्‍टाच्या प्रवासातील अडचणी सांगितल्या.

Russia Ukraine War: युद्धाच्या ढगातून युक्रेनहून आणला श्वान
Jhund : 'झुंड' च्या वादावर नागराज मंजुळेंचं भाष्य; पाहा व्हिडीओ

प्राण्याप्रती निष्ठेचे उदाहरण

श्वान हा माणसाचा अतिशय इमानदार पाळीव म्हणून अनेक अनुभव आहे. पण या मुक्या प्राण्याप्रती तितकीच इमानदारी दाखविणारे मालकही काही कमी नाहीत. अशापैकीच रोहन आंबुरे या युवकाची सध्या नाशिकला चर्चा आहे. बॉम्बवर्षावामुळे युक्रेन होरपळत असल्याने जिवाच्या भीतीने प्रत्येकाला घरी जाण्याची ओढ लागली असताना अशा जीवघेण्या स्थितीत नाशिकच्या रोहनने त्याच्या डेल्टा या श्वानाला वाऱ्यावर न सोडता सुखरूपपणे नाशिकला आणले. त्यासाठी रोहनला जोखीम, वेळ आणि पैसा याची मोठी किंमतही चुकवावी लागली. विशेष म्हणजे रोहनने ती चुकवलीही पण त्याच्या डेल्टाप्रती प्रेमाच्या कसोटीला तो पुरेपुर उतरला.

ओडीशी ते रोमानिया

रोहन सहा वर्षापासून युक्रेनला ओडीशीत वैद्यकीय शिक्षणासाठी आहे. नाशिकपासून दूर युक्रेनसारख्या देशात एकाकी राहताना दोन वर्षापूर्वी त्याने तेथे ‘सार्बेरियन हस्क’ जातीचा डेल्टा हा श्वान घेतला. दोन वर्षाच्या त्यांच्यात बॉंडीग निर्माण झाले. अशातच अकरा दिवसांपासून युक्रेन -रशिया यांच्यात युद्ध सुरु झाले. देशविदेशातील हजारो तरुणांचे तांडे उने तापमानात मिळेल त्या ठिकाणी तंबू आश्रयाने युक्रेन सोडण्यासाठी प्रयत्नशील आहेत. युक्रेन सोडण्याच्या गर्दीत हजारो विद्यार्थ्यांत अनेक जण असेही युवक होते की जे त्यांच्या मुक्या जिवांना घेऊनच स्वतः:च्या देशात जायचे होते. रोहन आंबुरे २४ फेब्रुवारीला भारतात यायला निघाला. मात्र त्यासाठी त्याला डेल्‍टाला तेथेच सोडावे लागणार होते. पासर्पोट नसल्याने सोबतचे विद्यार्थी भारतात परतले याला मात्र तेथेच थांबावे लागले. चार दिवसांनंतर डेल्टाचा या श्वानाचा पासपोर्ट मिळाला. यात वाढत्या युद्धजन्‍य स्थितीत माल्डा येथील भारतीय युवकांनी वर्गण्या काढून त्यांच्या ओळखी वापरून भारतीय युवकांना बाहेर काढण्यासाठी खूप मोठी मदत केल्याने रोहन याने ‘सकाळ’ ला सांगितले.

२३ हजार रुपये मोजले भाडे

या प्रवासात त्याला कुटुंबातील सदस्यांसह तेथील अनेकांनी अगदी सीमेवर अनेकांनी आधी स्वतःच्या जिवाचा विचार कर, श्वानच कुठं घेउन बसला. असेही सल्ले दिले. नाशिकला घरच्यांना काळजी लागली. पण डेल्टाशिवाय येणार नाही. असे ठाम सांगणाऱ्या रोहन याने घरी आई आजीला टीव्ही सक्तीने बंद ठेवण्याचा सल्ला दिला. इतरांचे सल्ले न मानता. तो भारतात निघाला. श्वानाला विमानातून आणण्याचे प्रत्येक देशाचे नियम

वेगळे आहेत. माणसाप्रमाणे श्वानाचा पासर्पोट काढावा लागतोच पण याशिवाय भाडे आकारणीचे नियमही भिन्न-भिन्न आहेत. विमान प्रवासात साधारण तीस किलोपर्यंतच्या सामानाचे भाडे आकारले जात नाही. त्यापुढील वजनाचे पैसे मोजावे लागतात. मात्र रोहनला प्रति किलो ७५० रुपये याप्रमाणे युद्धजन्‍य स्थितीत ३२ किलो वजनाच्या डेल्टाचे २३ हजार रुपये भरावे लागले. दिल्लीत आल्यानंतर अचानक एवढे पैसे कुठून आणणार असाही प्रश्न त्याच्यापुढे आला. त्यामुळे त्याला १२ तास डेल्टासह विमानतळावर घालावे लागले. अखेर आठ दिवसाच्या विलंबानंतर तो आज नाशिकला सुखरूप पोहोचला.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com