Nashik Water Crisis: नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट! गंगापूर धरणात अवघा 32 टक्के पाणीसाठा; पाऊस लांबल्यास...

जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा कमी होत चालला असून जिल्ह्यातील धरणांमध्ये २३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
Nashik News
Nashik NewsSaamtv
Published On

Nashik News: जून महिना उलटला तरी पावसाची चिन्हे दिसेना झाल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. तसेच या लांबलेल्या पाण्यामुळे नाशिक करांवर पाणी कपातीचे संकट ओढावण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा कमी होत चालल्याने पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. (Latest Marathi News)

Nashik News
Aadhar Card News: मतदारांसाठी महत्वाची बातमी! 'आधार' क्रमांक नसेल तरी मतदार यादीतून नाव काढणार नाहीत

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक (Nashik) जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा कमी होत चालला असून जिल्ह्यातील धरणांमध्ये २३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तसेच अनेक धरणांमध्ये २० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक राहिल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे. आगामी काळात पाऊस लांबल्यास नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट ओढावण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत..

तसेच उन्हाळा असल्याने नाशिककरांकडून पाण्याचा वापरही वाढला आहे. गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा 32 टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. गेल्या वर्षी गंगापूर धरणातील पाणीसाठा 29 टक्के होता. तेव्हाही पाऊस लांबण्याच्या शक्यतेने पाणीटंचाईचे संकट ओढावले होते.

Nashik News
Udayanraje vs Shivendraraje : साता-यात राडा; शिवेंद्रराजेंनतर तेथेच उदयनराजेंनी मारली कुदळ, म्हणाले...

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पाहिला तर पालखेड 36, करंजवण 13, ओझरखेड 25, दारणा 20, भावली 8, मुकणे 38, वालदेवी 19, चणकापूर 28, गिरणा 23 असा पाणीसाठा उपलब्ध आहे. तर गंगापूर धरणात 32, कश्यपी 14, गौतमी-गोदावरी 9, आळंदी 1 असा एकूण गंगापूर धरण समूहात 22 टक्के जलसाठा आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com